१. मलेशियात 'कॅडबरी' या आस्थापनांच्या चॉकलेटमध्ये डुकराच्या अवशेषांचा वापर करण्यात आल्याचे उघड झाल्याने मलेशियातील मुसलमान संघटनांनी त्या आस्थापनाच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हिंदूंना गोमाता अती पूजनीय आहे. भारतातही कॅडबरीसारख्या विदेशी कंपन्या चॉकलेट, तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवतात. त्यांमध्ये गोमातेचे अवशेष कशावरून वापरत नसतील ? मग असे खाद्यपदार्थ खाऊन धर्मद्रोह आणि पाप कशासाठी करायचे ?
२. 'कॅडबरी'सारखे चॉकलेट हे दूध नासवून त्यापासून बनवले जाते. त्यामुळे ते पचायला जड असल्याने एकप्रकारे आरोग्याला हानीकारकच असते.
३. विदेशी आस्थापनांनी बनवलेल्या कृत्रिम शीतपेयांमध्ये (सॉफ्ट ड्रींक्समध्ये) रासायनिक घटक असतात, तसेच सर्वांत मुख्य म्हणजे कार्बन-डाय-ऑक्साईड असतो. कार्बन-डाय-ऑक्साईड शरिराच्या बाहेर टाकायचा असतो आणि कृत्रिम शीतपेये पिऊन आपण तो शरिराच्या आत घेण्याचे उलटे काम करतो ! विदेशी आस्थापने भारतातीलच पाणी वापरून कृत्रिम शीतपेये बनवतात. आज भारतात सहस्रो गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही आणि जेथे आहे, तेथे ते पुष्कळ दूरवरून आणावे लागते. असे असतांना केवळ स्वतःच्या सुखासाठी भारतातील कोट्यवधी लिटर पाण्याचा चुराडा करून बनवलेली शीतपेये पिणे, हा राष्ट्रीय अपराध नाही का ?
४. आज विदेशी आस्थापनांनी भारतीय बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर हस्तगत केली असल्यामुळे भारताचे कोट्यवधी रुपये प्रतिदिन या विदेशी कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात जात आहेत. त्यामुळे ते देश श्रीमंत होत चालले असून भारत दरिद्री होत चालला आहे ! मग विदेशी आस्थापनांचा ग्राहक बनणे, हे राष्ट्रीय पातक नाही का ?
५. विदेशी कंपन्यांचे चॉकलेट आणि अन्य खाद्यपदार्थ यांना पर्याय म्हणून भारतीय जनता मनुका, शेंगदाण्याची चिक्की यांसारख्या खाद्यपदार्थांचा उपयोग करू शकते. विदेशी कंपन्यांच्या कृत्रिम शीतपेयांना पर्याय म्हणून भारतीय जनता ऊसाचा रस, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी यांसारख्या पेयांचा उपयोग करू शकते. हे भारतीय पदार्थ स्वस्त तर आहेतच, तसेच आरोग्याला पोषकही आहेत.
भारतियांनो, विदेशी आस्थापनांचे खाद्यपदार्थ, पेये आणि इतर वस्तू यांची खरेदी करून राष्ट्राचा पैसा विदेशी आस्थापनांच्या घशात घालण्यापेक्षा तो पैसा स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांच्या कार्यासाठी उपयोगात आणून देशसेवा आणि धर्मसेवा करा ! हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या वाटेवरील ते एक महत्त्वाचे पाऊलच आहे ! – (पू.) श्री. संदीप आळशी (३१.५.२०१४) संदर्भ : दैनिक सनातन प्रभात