स्वातंत्र्यवीर सावरकर


" झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा "

१.हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर

२. दोन देशांच्या सरकारांनी ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धिपूर्वीच प्रतिबन्ध घातला असे जगातील आद्य लेखक

३. हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून ज्यांची पदवी विद्यापीठाने काढून घेतली असे आद्य पदवीधर

४. हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे ज्यांना बॅरिस्टर पदवी नाकारण्यात आली असे आद्य विधिज्ञ

५. विदेशी कपड्यांची निर्भयपणाने प्रकट होळी आयोजित करणारे आद्य देशभक्त

६. हिन्दुराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वस्पर्शी विचार करणारे, अस्पृश्यता व जातिभेद यांच्याविरुद्ध बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर

७. ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार नाकारणारे आद्य भारतीय बंडखोर नेते

८. पन्नास वर्षे सीमापारीची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले आणि ती पुरुन उरल्यानंतर सक्रिय कार्य करणारे जगातील आद्य राजबंदीकारागृहात लेखनसाहित्य न मिळाल्यामुळे काट्याकुट्यांनी कारागृहाच्या भिंतींवर सुमारे दहा सहस्त्र ओळींचे काव्य कोरून लिहिणारे आणि ते सहबंदिवानांकडून मुखोद्गत करवून घेऊन प्रसिद्ध करविणारे जगातील आद्य कवी

९. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांची अटक गाजली असे हिन्दुस्थानचे आद्य राजबंदीयोगशास्त्राच्या उत्तुंग परंपरेनुसार प्रायोपवेशनाने मृत्युला कवटाळणारे आद्य आणि एकमेव क्रांतिकारक महायोगी

साभार : www.savarkar.org

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली स्फूर्तीगीते ऐकण्यासाठी खाली क्लिक करा !

' हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा '

' ने मजसी ने परत मातृभूमीला '

' जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे '

Leave a Comment