भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी दुःखहारी (टीप १) धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
पाताळदेवताहंता भव्य सिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगे उचली बाहू आवेशें लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडे माईले (टीप २) नेणों आवळें दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी त्राहिटिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटिं कासोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती । (टीप ३)
मनासी टाकिलें मागें गतीसी (टीप ४) तुळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडा येवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरुमंदार धाकुटें ॥११॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छे करू (टीप ५) शके ।
तयासी तुळणा कैंचीं ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां ग्रासिले (टीप ६) सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठें करूनियां ॥१४॥
भूतप्रेतसमंधादी रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणें ॥१६॥
रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू (टीप ७) ।
रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥१७॥
इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
स्तोत्रातील काही शब्दांचे पाठभेद
टीप १ – शोकहर्ता
टीप २ – ब्रह्मांड माईला
टीप ३ – आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती।
टीप ४ – गतीस
टीप ५ – वज्रपुच्छ घालूं
टीप ६ – गिळीलें