कौरव-पांडवकालीन तारका शास्त्रज्ञ गर्गमुनी यांनी नक्षत्राचा शोध लावला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जीवनाविषयी गर्गमुनी यांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. कौरव-पांडव यांचे भारतीय युद्ध मानवसंहारक झाले; कारण युद्धाच्या प्रारंभीच्या पक्षामध्ये तिथीक्षय होऊन तेराव्या दिवशी अमावास्या आली होती. नंतरच्या पक्षातही तिथीक्षय होता. पौर्णिमा चौदाव्या दिवशी आली आणि त्यादिवशी चंद्रग्रहण होते, असे भविष्य गर्गमुनी यांनी वर्तविले होते.