रायरेश्र्वर

शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्र्वराच्या डोंगरावर.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

रायरेश्र्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते. रायरेश्र्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाणही मोठे आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्र्वर, कोल्हेश्र्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा

रायरेश्र्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे.

१. टिटेधरण कोर्लेबाजूने
पुण्याहून भोरमार्गेआंबवडे गाठावे. तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्र्वरावर जाता येते. वेळ साधारण ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे.

२. भोर-रायरी मार्गे
भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी ६ वाजता (मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदर्याची वाट म्हणून देखील संबोधतात. या वाटेने रायरेश्र्वर गाठण्यास दोन तास लागतात.

३. केजंळगडावरुन केजंळगडावरुन सूणदर्याने किंवा श्र्वानदर्याने सुध्दा रायरेश्र्वरला जाता येते.

राहण्याची सोय : रायरेश्र्वरावर मंदिरात किंवा गावात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.

Leave a Comment