बालमनावर जे संस्कार केले जातात त्यानुसार पुढील काळात मुलांना सवयी लागतात. बालवयातच होणार्या संस्कारांवरच मुलाची जडण-घडण अवलंबून असते. स्वत:च्या मुलावर काय संस्कार करायचे, हा प्रश्न सर्वसामान्यपणे अनेकांना निर्माण होऊ शकतो. त्यासाठी मुलांना कोणत्या सवयी लावाव्यात याबाबतची माहिती येथे देत आहोत.
या गटातील मुलांना खालील सवयी लावाव्यात तसेच संस्कारही करावेत
१. जेवणाआधी हात-पाय व तोंड स्वच्छ धुणे.
२. आपल्या स्वतःच्या हाताने जेवणे.
३. प्रत्येक जेवणानंतर किंवा काहीही खाल्यावर चूळ भरणे व दात स्वच्छ घासणे.
४. संडास केल्यानंतर स्वतः गुदद्वाराचा भाग व हात-पाय पाण्याने स्वच्छ करणे.
५. स्वतंत्रपणे वेगळ्या बिछान्यात झोपणे व जरूरी वाटल्यास रात्री कमी प्रकाशाच्या दिव्याचा वापर करणे.
६. शिंकतांना व खोकतांना नाका-तोंडावर हातरुमाल धरणे.
७. ‘धन्यवाद’,‘नमस्कार’ अशा शब्दांचा वापर करून लोकांचे स्वागत करणे.
८. खेळून झाल्यावर स्वतःची खेळणी कपाटात व्यवस्थित लावून ठेवणे.
९. शूरवीरांच्या गोष्टी ऐकणे.
१०. सुभाषिते, म्हणी किंवा वाक्यप्रचार तोंडपाठ करून योग्य ठिकाणी त्याचा वापर करणे.
११. रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर देवाचे नामस्मरण करणे.
१२. दररोज सर्व वडील-माणसांना खाली वाकून नमस्कार करणे.