वल्लभाचार्य


भक्तिकालीन सगुणधारेच्या कृष्णभक्ति शाखेचे आधारस्तंभ आणि पुष्टिमार्गाचे प्रणेता श्रीवल्लभाचार्यजी यांचे प्रादुर्भाव संवत् १५३५, चैत्र कृष्ण पक्ष एकादशी या दिवशी दक्षिण भारताच्या कांकरवाडग्रामवासी तैलंग ब्राह्मण श्रीलक्ष्मणभट्ट यांची पत्नी इलम्मागारू यांच्या पोटी काशीजवळ झाले. त्यांना वैश्वानरावतार (अग्निचा अवतार) म्हटले आहे.ते वेदशास्त्रात पारंगत होते.

दीक्षा

श्रीरूद्रसंप्रदायाचे श्रीविल्वमंगलाचार्यजी यांच्या द्वारे यांना अष्टादशाक्षरगोपालमंत्राची दीक्षा दिली गेली.त्रिदंड संन्यासाची दीक्षा स्वामी नारायणेन्द्रतीर्थ यांच्याकडून प्राप्त झाली. विवाह पंडित श्रीदेवभट्टयांची कन्या- महालक्ष्मीसमवेत झाले, आणि यथासमय दो पुत्र झाले – श्री गोपीनाथ आणि श्रीविट्ठलनाथ.भगवत्प्रेरणावश व्रजमध्ये गोकुळात पोचले , आणि तदनन्तर व्रजक्षेत्रस्थित गोव‌र्द्धन पर्वटावर आपली गाडी स्थापित करून शिष्य पूरनमल खत्री यांच्या सहयोगाने संवत् १५७६ मध्ये श्रीनाथजी यांचे भव्य मंदिर निर्माण करून घेतले. तेथे विशिष्ट सेवा-पद्धतीबरोबर लीला-गानांतर्गत श्रीराधाकृष्णाच्या मधुरातिमधुरलीलांशी संबंधित रसमय पदांची स्वर-लहरीचे अवगाहन करून भक्तजन दंग होऊन जात.

मत

श्रीवल्लभाचार्य यांच्या मतानुसार तीन स्वीकार्य तत्त्‍‌व आहेत -ब्रह्म, जगत् और जीव.ब्रह्माचे तीन स्वरूप वर्णित आहेत आधिदैविक, आध्यात्मिक एवं अंतर्यामी रूप.अनंत दिव्य गुणांनी युक्त पुरुषोत्तम श्रीकृष्ण यालाच परब्रह्म स्वीकारून त्याचे मधुर रूप आणि लीलांच जीवात आनंदाच्या आविर्भावाचे स्त्रोत मानले आहे. जगत् ब्रह्माच्या लीलेचा विलास आहे .संपूर्ण सृष्टि लीलेचे निमित्त ब्रह्माची आत्म-कृति आहे.

सिद्धांत

जीवांचे तीन प्रकार आहेत – पुष्टि जीव जे भगवंताच्या अनुग्रहावर निर्भर राहून नित्यलीलेत प्रवेशाचे अधिकारी होतात, मर्यादा जीव जे वेदोक्त विधींचे अनुसरण करत भिन्न-भिन्न लोक प्राप्त करुव घेतात आणि प्रवाह जीव जे जगत्-प्रपंचातच निमग्न राहून सांसारिक सुखांच्या प्राप्तिहेतु सतत् चेष्टारत असतात.

भगवान् श्रीकृष्ण भक्तांच्या निमित्त व्यापी वैकुंठात (जो विष्णुच्या वैकुंठाच्या वर स्थित आहे.) नित्य क्रीडा करत.याच व्यापी वैकुंठाचे एक खण्ड आहे – गोलोक, ज्याच्यात यमुना, वृंदावन, निकुंज आणि गोपी नित्य विद्यमान आहेत. भगवद्सेवेच्या माध्यमाने तेथे भगवंताच्या नित्य लीला-सृष्टीत प्रवेश हीच जीवाची सर्वोत्तम गति आहे.

प्रेमलक्षणाभक्ति उक्त मनोरथाच्या पूर्तीचे मार्ग आहे, ज्याच्याकडे जीवाची प्रवृत्ति मात्र भगवद्नुग्रहद्वारेच संभव आहे.श्री मन्महाप्रभुवल्लभाचार्य यांचा पुष्टिमार्गाचे (अनुग्रह मार्ग) हेच आधारभूत सिद्धांत आहे. पुष्टि-भक्तीच्या तीन उत्तरोत्तर अवस्था आहेत . प्रेम,आसक्ति आणि व्यसन.मर्यादा-भक्तीत भगवद्प्राप्तिशमदमादिसाधनांने होते, किंतु पुष्टि-भक्त्तीत भक्ताला कोणत्याही साधनाची आवश्यकता नसून मात्र भगवद्कृपेचे आश्रय असते. मर्यादा-भक्ति स्वीकार्य करतांनाही पुष्टि-भक्तिच श्रेष्ठ मानली गेली आहे. पुष्टिमार्गीयजीवाची सृष्टि भगवत्सेवार्थच आहे- भगवद्रूपसेवार्थ तत्सृष्टिर्नान्यथाभवेत्.प्रेमपूर्वक भगवत्सेवाभक्तिच यथार्थ स्वरूप आहे. भक्तिश्च प्रेमपूर्विकासेवा.भागवतीय आधारावर (कृष्णस्तु भगवान् स्वयं) भगवान कृष्ण हेच सदा सर्वदासेव्य, स्मरणीय तथा कीर्तनीय आहे.

सर्वदा सर्वभावेनभजनीयोब्रजाधिप:।..
तस्मात्सर्वात्मना नित्यंश्रीकृष्ण: शरणंमम।

ब्रह्माच्या बरोबर जीव-जगताचे संबंध निरूपण करत त्यांचे मत होते, की जीव ब्रह्माचे सदंश [सद् अंश] आहे , जगतसुद्धा ब्रह्माचा सदंश आहे .अंश आणि अंशीमध्ये भेद नसण्याचे कारण जीव-जगत् आणि ब्रह्म यांत परस्पर अभेद आहे.अंतर केवळ एवढेच आहे की जीवात ब्रम्हाचे आनंदांश आवृत्त असते, आणि जड जगतातयाचे आनन्दांश आणि चैतन्यांश दोन्हीच आवृत्त असतात.

श्रीशंकराचार्य यांच्या अद्वैतवाद केवलाद्वैताच्या विपरीत श्रीवल्लभाचार्याच्या अद्वैतवादात मायेचे संबंध अस्वीकार करत ब्रह्माला कारण आणि जीव-जगताला त्याचे कार्य रूपात वर्णित करत तिन्ही शुद्ध तत्वांचे ऐक्य प्रतिपादित केल्या कारणानेच उक्त मताला शुद्धाद्वैतवाद म्हटले गेले (ज्याचे मूळ प्रवर्तकाचार्य श्री विष्णुस्वामीजी आहेत.)

शिष्य परंपरा

वल्लभाचार्य यांच्या ८४ शिष्यांत अष्टछापकविगण- भक्त सूरदास, कृष्णदास, कुम्भनदास आणि परमानन्द दास प्रमुख आहेत. श्री अवधूतदासनामक परमहंस शिष्यही होते.सूरदास यांची खरी भक्ति आणि पद-रचनेत निपुणता बघून अति विनयी सूरदास यांना भागवत् कथा श्रवण करवून भगवल्लीलागानाकडे उन्मुख केले आणि त्यांना श्रीनाथमंदिराची की‌र्त्तन-सेवा दिली.तत्व ज्ञान आणि लीला भेदही सांगितले –

श्रीवल्लभगुरू तत्त्‍‌व सुनायो लीला-भेद बतायो (सूरसारावली) सूरदासांची गुरूंप्रति निष्ठा दृष्टव्य आहे.

भरोसो दृढ इन चरननकेरो।
श्रीवल्लभ-नख-चन्द-छटा बिनुसब जग मांझअधेरो॥

श्रीवल्लभाच्या प्रतापाने प्रमत्तकुम्भनदास तर सम्राट अकबराचे ही मान-मर्दन करायाला घाबरले नाही- परमानन्ददास यांचे भावपूर्ण पद श्रवण करून महाप्रभु किती दिवश बेशुद्ध पडून राहिले.मान्यता ही आहे की उपास्य श्रीनाथने कलि-मल-ग्रसित जीवांच्या उद्धारासाठी श्रीवल्लभाचार्य यांचे दुर्लभ आत्म -निवेदन -मन्त्र प्रदान केले आणि गोकुळाच्या ठकुरानी घाटावर यमुना महारानीने दर्शन देऊन कृतार्थ केले. त्यांच्या शुद्धाद्वैताचे प्रतिपादक प्रधान दार्शनिक ग्रन्थ आहेत- अणुभाष्य (ब्रह्मसूत्र भाष्य अथवा उत्तरमीमांसा). अन्य प्रमुख ग्रन्थ आहेत- पूर्वमीमांसाभाष्य, भागवताच्या दशम स्कंधावर सुबोधिनी टीका, तत्त्‍‌वदीप निबन्ध एवं पुष्टि -प्रवाह-मर्यादा.संवत् १५८७ ,आषाढ शुक्ल तृतीयेला त्यांनी अलौकिक रीतिने इहलीला संवरण करून सदेह प्रयाण केले.वैष्णव समुदाय त्यांचे सदा ऋणी राहील.

Leave a Comment