रक्षाबंधन

श्रावण मासातील हिंदूंच्या सणांचे महत्त्व !

‘विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आदर्श हिंदु संस्कृतीत आपण अनेक सण साजरे करतो. ‘हे सण काआणि कसे साजरे करावेत ? त्यामागील शास्त्र काय ?’, हे आपल्याला कुणी सांगत नाही. त्यामुळेआपल्या हिंदु सणांमध्ये अनेक विकृत आणि अयोग्य गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आपल्यालाआपल्याच सणांविषयी आदर आणि आपलेपणा वाटेनासा झाला आहे. मित्रांनो, हे योग्य आहे का ? आपलेसण म्हणजे सहज कुणालतरी वाटले किंवा कुणाच्या तरी मनात आले; म्हणून आपण साजरे करत नाही.समाजावर चांगले संस्कार व्हावेत आणि सर्वांची देवावरील श्रद्धा वाढावी’, यांसाठी आपल्या ऋषीमुनींनीया सणांची निर्मिती केली आहे.

मित्रांनो, आपण सर्व जण प्रत्येक सण भावपूर्ण साजरा करण्याचा निश्चय करूया. प्रत्येकाच्यामनात आपल्या (हिंदूंच्या) सणांविषयी आदर आणि भक्तीभाव निर्माण करूया. हिंदु धर्मातील प्रत्येकसणामागील उद्देश जाणून घेतला, तर आपण आदर्श आणि आनंदी जीवन जगू शकतो.

रक्षाबंधन

१.हिंदु संस्कृतीतील नातेसंबंध

१ अ. हिंदु संस्कृतीतील नात्यांचे बंधन आपल्याला आदर्श जीवन जगण्याचा पाठ शिकवतअसणे : मित्रांनो, आपल्या हिंदु संस्कृतीत अनेक नाती आहेत. नात्यांमुळेच आज आपण सर्व जणमाळेतील मण्यांप्रमाणे प्रेमाच्या नात्यांनी बांधलो गेलो आहोत. नात्यांच्या बंधनांमुळेच प्रत्येक कुटुंब आनंदीआणि सुखी आहे.

१ आ. पाश्चात्त्यांच्या विकृत अनुकरणाने नाती दुरावण्याचे भय निर्माण होणे : आपल्या हिंदुसंस्कृतीत कुणी कुणाची आई आहे, तर कुणी कुणाचा भाऊ किंवा बहीण आहे. आपल्याकडे पती, पत्नी,मामा, काका, काकी, मावशी अशी अनेक नाती आहेत. मित्रांनो, ही नाती नसती, तर आपण आदर्श जीवनजगू शकलो असतो का ? ही नातीच आम्हाला आदर्श जीवन जगण्याचा पाठ शिकवतात; परंतुपाश्चात्त्यांच्या अनुकरणाच्या विकृतीने ही सर्व नाती दुरावतील कि काय, याचीच चिंता वाटते. आजकालआपण पहातो की, कुणाला कुणाविषयी प्रेम आणि आपुलकीच उरली नाही.

१ इ. नाती जपणे आणि ती टिकवणे, म्हणजे हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे : मित्रांनो, आपल्याभावाला चांगले गुण मिळाल्यावर आपण ते सर्वांना आनंदाने सांगतो ना. आपल्या बाबांनी आपल्यालानवीन वस्तू आणल्यावर आपण ती सर्वांना दाखवतो. यातून आपल्याला लक्षात येईल की, नात्यांमुळेआपल्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद आपल्याला घेता येतो. नाती जपणे आणि तीटिकवणे, म्हणजे हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे होय.

मग मित्रांनो, आपण तसे करूया ना !

१ र्इ. हिंदु संस्कृतीतील रक्षाबंधन सणामुळे ‘बहीण – भावा’च्या नात्याचे संवर्धन होणे : मित्रांनो,रक्षाबंधन हा सण ‘बहीण-भावा’च्या नात्याचे संवर्धन करतो. बहीण आणि भाऊ यांच्यातील नात्यालासुद्धाफार महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. यातून त्यांच्यामधील प्रेम वृद्धींगत होते. राखीबांधणार्‍या बहिणीचे रक्षण करण्याचे दायित्व भावाचे असते.

१ उ. रक्षाबंधनाने या नात्याचे पवित्र बंधनात रूपांतर होणे : जेव्हा एखादी मुलगी अथवा स्त्रीएखाद्या मुलाला किंवा पुरुषाला राखी बांधते, त्या क्षणाला ती त्याची बहीण होते. आपले सण किती महानआहेत ना ! एका रक्षाबंधनाने नात्याचे पवित्र बंधनात रूपांतर होते.

१ ऊ. आपल्या सणांचे महत्त्व न जाणल्याचे दुष्परिणाम : आज आपले दुदैव असे की, ज्या दिवसांनामहत्त्व नाही, ते आपण आंधळ्यासारखे साजरे करत आहोत. आजच्या मुलांना रक्षाबंधनाचे महत्त्व ठाऊकनसल्याने ते पाश्चात्त्यांचे ‘फ्रेंडशिप डे’, ‘रोज डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ असले निरर्थक आणि अर्थहीन ‘डे’(दिवस) साजरे करतात. मित्रांनो मला सांगा, या ‘डे’ साजरे करण्यातून कोणती पवित्र नाती समाजातनिर्माण होतात ? समाजाला यातून कोणता लाभ होतो ? उलटपक्षी हानीच होते.

मित्रांनो, मग आपण हे ‘डे’ का साजरे करायचे ? तुम्ही नाही ना हे साजरे करणार ? रक्षाबंधनाच्यादिवशी आपण निश्चय करूया, ‘आम्ही पाश्चात्त्यांचे निरर्थक ‘डे’ साजरे करणार नाही !’

१ ए. रक्षाबंधन म्हणजे दिवसेंदिवस स्त्रियांवर वाढणारे अत्याचार रोखण्याचा निश्चय करण्याचादिवस ! : मित्रांनो, आपण प्रत्येक दिवशी वर्तमानपत्रात स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्या वाचतो.समाजातील ही विकृती आपल्याला नष्ट करायची असेल, तर प्रत्येक पुरुषाने ‘या राष्ट्रातील प्रत्येक स्त्रीमाझी बहीण आहे आणि तिचे रक्षण करणे, हे माझे परम कर्तव्य आहे’, असा निश्चय केला पाहिजे.त्यामुळे यापुढे समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार नक्कीच थांबतील. हेच खरे रक्षाबंधन ठरेल !

मित्रांनो, आपण असा निश्चय करूया ना ?

– श्री. राजेंद्र महादेव पावसकर (गुरुजी), पनवेल.

रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र पाठविण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment