व्यसनांचे दुष्परिणाम कोणते ? व्यसनमुक्त कसे व्हायचे ?

        आजकाल विविध व्यावहारिक/ ऐहिक कारणांसाठी, विशेषतः चिंतामुक्त होण्यासाठी किंवा मौजमजा करण्यासाठी मनुष्य निरनिराळ्या व्यसनांचा आधार घेतो. मनुष्य ‘व्यसन’ का करतो? आध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास काही आध्यात्मिक कारणांमुळे जीवनात अडचणी/समस्या उत्पन्न होतात. अशाच काही समस्यांची उदाहरणे खाली दिलेली आहेत.

अ. व्यसनांचे व्यावहारिक दैनंदिन दुष्परिणाम

        दैनंदिन जीवनात उद्‌भवणार्‍या समस्यांची काही उदाहरणे, उदा. परिक्षेच्या वेळी आजारी पडणे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही अपेक्षित यश न मिळणे, नोकरी न मिळणे, घरात भांडण-तंटे, लग्न न होणे, लग्न झाले तर पती-पत्‍नीचे न पटणे, पटले तर स्वत:मध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसतांना मूल न होणे, मूल झाले तर मतिमंद किंवा विकलांग होणे, अपमृत्यु, धंदा न चालणे, दारिद्र्य, शारीरिक आजार अशा समस्या उद्‌भवतात.

आ. व्यसनांचे शारीरिक दुष्परिणाम

        सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुप्फुसे, हृदय, जठर, मूत्रपिंडे, तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग  व इतर भयंकर रोग होतात.

इ. व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम

        व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय.

ई. व्यसनांचे आध्यात्मिक दुष्परिणाम

        व्यसनांमुळे मनुष्यातील तमोगुण वाढतो. त्यामुळे मनुष्याकडे काळी (त्रासदायक) शक्ती लवकर आकृष्ट होऊन ती त्याच्या शरिरात साठते. याचा लाभ घेऊन वाईट शक्ती मनुष्यावर ताबा मिळवतात. वाईट शक्ती त्या मनुष्याला विविध प्रकारचे त्रास देतात, तसेच त्याच्याकडून दुष्कृत्ये करवून घेतात.

उ. व्यसनमुक्त होण्यासाठी हे करा !

        ‘व्यसन दूर करणे कठीण आहे’, ही पराभूत मानसिकता झुगारून द्या आणि ‘व्यसनाच्या विचारांशी लढून व्यसनरूपी शत्रूला ठार मारायचे आहे’, ही विजिगिषू वृत्ती अंगी बाणवा ! मनाला खंबीर बनवण्यासाठी ‘साधना’ करा ! साधना म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांनी दररोज किमान १ तास तरी `श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करावा. तसेच दर गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जाऊन भावपूर्ण नमस्कार करून दत्ताला ७ प्रदक्षिणा घालाव्यात.

नामजप येथे ऐका

// <![CDATA[


// ]]>// <![CDATA[


// ]]>

Leave a Comment