एक जण स्वतःहून गोकुळात जायला निघाला. त्याला नावेत बसून यमुना पार करायची होती; पण तो भांगेच्या नशेत होता. नावेत बसला आणि वल्ही मारायला लागला. संपूर्ण रात्र नाव चालवली, सकाळ झाली. मथुरेसारखे दुसरे कोणते गाव आले; म्हणून त्याने एकाला विचारले, तर ती मथुराच होती. मग त्याच्या लक्षात आले की, त्याने नावेचा दोरखंड सोडलाच नव्हता. नशेत असल्यामुळे तो दोरखंड सोडायचा विसरला होता. सर्व रात्र वल्ही मारूनही तिथेच होता.
आपणसुद्धा जीवननौकेतून प्रवास करतांना वासनारूपी दोर न सोडल्यास भगवंतापर्यंत पोहोचणार नाही.
– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)