गोमंतकाच्या आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक म्हणून डॉ. त्रिस्तावब्रागांझ कुन्हा यांचा सार्थ गौरव भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात नोंदला गेला आहे. गोमंतकाचा स्वातंत्र्यसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन करणारे आणि त्यानुसार कृती करणारे विचार मांडणारे डॉ. कुन्हा हे पहिले स्वातंत्र्यसेनानी होते. गोवा मुक्तीपूर्व गोवा काँग्रेससमितीचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. गोमंतकाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन जेनेते सतत कृतीशील राहिले, त्यांपैकी डॉ. टी.बी. कुन्हा एक होते.
दिसेल त्याला कापून काढणार्या सहिष्णू (?) आल्फान्सो द आल्बुकर्क याचा बुरखा फाडणारे डॉ. कुन्हा !
‘आल्फान्सो द आल्बुकर्क यांची तथाकथित सहिष्णुता आणि सेंट फ्रान्सिसझेवियर यांचे तथाकथित अद्भुत चमत्कार, या इतिहासाचा एकही पुरावा नसलेल्या दोनदंतकथांचा स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांनी लिहिलेल्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकात पर्दाफाश केला आहे. आल्बुकर्कसंबधी माहिती देतांना त्यांनी२२.१२.१५१०या दिवशी लिहिलेल्या पत्राचा या पुस्तकात उल्लेख केला आहे.आल्बुकर्क सदर पत्रात लिहितो, ‘‘गोवा जिंकायला आणि प्रदेशाची विल्हेवाट लावत किल्ल्यात प्रवेश करायला आपल्या देवाची खूप कृपा झाली. सुमारे ३०० टर्क मारलेगेले. बाणस्तारी आणि गावंढळी जायच्या मार्गांत पुष्कळ लोक मारले गेले. मग मी सार्या शहराला आग लावली. समोर दिसेल त्याला कापून काढले. किती तरी दिवस आपल्यालोकांनी त्यांच्या रक्ताचे पाट वाहिले. कुठलाही सलमान दिसता क्षणी जिवंत सुटला नाही. मशिदी लोकांनी भरल्या व पेटवल्या. मुसलमानांनी राज्य सरकारविरुद्ध केलेल्या विश्वासघाताचा बदला घेतला.’’
विलायती गोष्टीचे अनुकरण आणि देशी गोष्टी तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती सोडून देशाभिमान जागवण्यासाठी प्रयत्न करणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा !
‘गोवा स्वातंत्र्यसंग्रामातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांनी छापलेल्या या पुस्तकात इतिहासातील अनेक सत्य उल्लेखलेली आहेत. हिंदु आणि खिश्चन दोन्ही गोवेकर समाजातील शारीरिक अन् नैतिक दौर्बल्य, खुशामत करण्याचीसवय, अभिमानशून्यता, चारित्र्यहीनता या सगळ्याला देशांतर आणि जप्तीच्या धमकीनेकेलेली धर्मांतराची आतंकवादी पद्धतच जबाबदार आहे. राष्ट्रीयत्वाच्या र्हासामुळे प्रत्येक विलायती गोष्टीचे अनुकरण करणे आणि देशी गोष्टी तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती,यांचा परिणाम म्हणजे समाज चंगळखोर बनला आहे. तेव्हा या चक्रातून मुक्त होण्यासाठी आमच्यामध्ये स्वाभिमान आणि देशाभिमान निर्माण व्हायला मन सिद्ध केले पाहिजे. दास्यत्व, तसेच चारित्र्यहीन आणि माकडासारखी नक्कल करण्याची प्रवृत्ती यांपासून मनाला परावृत्त करायला पाहिजे. राजकीय, वैचारिक, सामाजिक, आर्थिकसर्वच बाबतीत आपल्या राज्यकत्र्यांविरुद्ध आणि आमच्या दैनंदिन सवयींविरुद्ध बंडकरायला पाहिजे, असा सतत संघर्षाचा संदेश थोर सेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यापुस्तकात दिला आहे. वर्तमानकाळातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड, विविध राज्यांतीलधर्मांतराची प्रकरणे, शैक्षणिक क्षेत्रातील चर्चची वाढती दादागिरी, या सर्व पाश्र्वभूमीवर कुन्हा यांचे विचार आणि सत्य इतिहास कथन खूपच मार्गदर्शक ठरते. गोमंतकियांनीआता राष्ट्रीयत्वाच्या र्हासामुळे आणि अनेक शतकांच्या आतंकवादी राजवटीमुळे राज्यकर्त्यांच्या गुलामगिरीचे जे बीज मनात रुजले आहे, ते उपटून टाकणे आवश्यकआहे. नामर्दपणा झुगारून देऊन आता या नव्या युगात रहाण्याला लायक बनण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.’२६.९.१९५८ या दिवशी मुंबईत डॉ. टी.बी. कुन्हा यांचे दुःखद निधन झाले .
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’, भाद्रपद कृ. द्वादशी, कलियुग वर्ष ५११०