‘अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे’, असे मानून ते ‘देवाचा प्रसाद म्हणून आणि नामजप करत ग्रहण केल्याने ते एक पवित्र यज्ञकर्मच बनते. भोजनादी आचारकर्माच्या आचरणातून ‘भोजन हे यज्ञकर्म बनावे यासाठी पुढील काही सूचनांचे पालन करावे.
१. आंघोळीच्या आधी जेवू नये.
२. शक्यतो दुपारी १२ वाजेपर्यंत सकाळचे आणि रात्री ९ च्या आत रात्रीचे जेवण घ्या.
३. शक्यतो पूर्व दिशेला अन्यथा पश्चिम दिशेला तोंड करून भोजनास बसा.
४. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा
५. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.
६. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.
७. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥
८. अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना – `हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्ती व चैतन्य मिळू दे.’
९. अन्न देवाला अर्पण करा व नंतर देवाचा प्रसाद म्हणून नामजप करत ग्रहण करा.
१०. जेवण झाल्यानंतर तीन वेळा चूळ भरावी.
११. एकमेकांचे उष्टे अन्न खाल्ल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो; म्हणून उष्टे अन्न खाऊ नका.
१२. अन्न पायदळी तुडवले जाऊ नये, यासाठी जेवणानंतर ताटाभोवती सांडलेले अन्नकण उचला.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘भोजनापूर्वीचे आचार’