पौराणिक कारण
‘एक अप्सरा अति सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला गणपती दिसला. तिला तो फार आवडला; म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यसाठी तिने हाका मारल्या, ”हे एकदंता, हे लंबोदरा, हे वक्रतुंडा !” ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले. तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, ”हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस?” ती म्हणाली, ”मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.” गणपती म्हणाला, ”मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही.” त्यावर अप्सरा म्हणाली, ”तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.” गणपतीने तिला प्रतिशाप दिला, ”तू पृथ्वीवर वृक्ष होशील.” अप्सरेला पश्चाताप होऊन ती म्हणाली, ”मला क्षमा कर.” गणपती म्हणाला, ”माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील.” ती अप्सरा पुढे तुळस बनली. गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून गणपतीला तुळस वाहत नाहीत.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘श्री गणपति ‘