श्लोक अर्थासहित
१. नमस्ते शारदे देवि वीणापुस्तकधारिणि ।
|
अर्थ : हाती वीणा आणि ग्रंथ धारण केलेल्या हे सरस्वती देवी तुला वंदन करून मी अभ्यासाला प्रारंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
२. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
|
अर्थ : वाईट मार्गाने आचरण करणार्यांना सरळ मार्गावर आणणार्या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्यांची प्रभा लाभलेल्या हे देवा श्रीगणेशा माझी सर्व कार्ये नेहमी निर्विघ्नपणे पार पडू देत.
३. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
|
अर्थ : भूतलावर अवतरित होऊन भक्तजनांचे मनोरथ पूर्ण करणार्या, रामचंद्र, प्रजापती, रघुनाथ, नाथ, सीतापती रामश्रेष्ठाला मी वंदन करतो.
४.मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
|
अर्थ : मनाप्रमाणे वेगाने धावणार्या, वायूप्रमाणे गती असलेल्या, इंद्रियांचे दमन केलेल्या, बुद्धिमंतांमध्ये सर्वांत श्रेष्ठ असलेल्या, वानरसेनेतील मुख्य, वायुपुत्र, श्रीरामदूत मारुतीला मी शरण आलो आहे.
५. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
|
अर्थ : वसुदेवपुत्र कृष्णाला , सर्व दु:ख हरण करणार्या परमात्म्याला , शरणागतांचे क्लेश दूर करणार्या गोविंदाला नमस्कार असो.
६. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
|
अर्थ : गुरू हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्रीगुरूंना मी नमन करतो.
७. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
|
अर्थ : सर्व मंगलमय गोष्टींतील मांगल्यरूप, कल्याणदायिनी, सर्व इष्ट फळ देणार्या, शरणागतांस आश्रय देणार्या, त्रिनयने, गौरी, नारायणी तुला नमस्कार असो.
८. शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
|
अर्थ : शरण आलेल्या दीन दुबळ्यांना तारण्यास तत्पर असलेल्या, सकल विश्वाचा ताप दूर करणार्या हे देवी नारायणी (दुर्गे) तुला माझा नमस्कार असो.
९. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्।
|
अर्थ : अखंडमंडलाकार सृष्टीला व्यापून ज्यांनी (आम्हाला) त्यांच्या चरणांशी घेतले त्या श्रीगुरूंना आमचा नमस्कार असो.
१०. नमः सर्वविदे तस्मै व्यासाय कविवेधसे ।
|
अर्थ : सर्वज्ञ, कवींमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या, आपल्या प्रतिभेने मेघवृष्टीसमान महाभारत नावाचे पुण्यदायी काव्य करणार्या भगवान श्रीवेदव्यासांना नमस्कार असो.
सुभाषिते अर्थासहित
१. विद्यारत्नं महद्धनम् । |
अर्थ : विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे.
२. सा विद्या या विमुक्तये । |
अर्थ : मोक्षप्राप्ती करणे शिकवते तीच खरी विद्या होय.
३. सत्यं कण्ठस्य भूषणम् । |
अर्थ : सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.
४. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । |
अर्थ : शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे.
५. संघे शक्तिः कलौ युगे । |
अर्थ : कलियुगामध्ये एकजुटीत शक्ती आहे.
६. आचार्यदेवो भव । |
अर्थ : आचार्यांमध्ये देव पहा.
७. मातृदेवो भव । |
अर्थ : मातेला देवाप्रमाणे पहा.
८. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी । |
अर्थ : आई आणि जन्मभूमी या स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.
९. गुरुशुश्रूषया विद्या । |
अर्थ : विद्या ही गुरूंच्या सेवेने प्राप्त होते.
१०. व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् | |
अर्थ : या जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उच्छिष्ट आहे.