एक विद्यार्थी असा होता की तो शंकाच जास्त काढायचा आणि त्यातल्या कुशंकाच जास्त असायच्या. तो गुरूला नेहमी म्हणे, ‘मला परमेश्वराचे दर्शन लवकर घडवा. तुम्ही पक्षपाती आहात. माझ्यापेक्षा माझ्या गुरुबंधूला ज्ञान जास्त देता.’ मग त्याला म्हणे एक मार्ग दाखवला त्याच्या गुरूने. नदीवर स्नानाला गेले असताना नदीत बुडवून ठेवला थोडावेळ ! त्यावेळी त्याचा तडफडाट सुरु झाला. केव्हा एकदा श्वास घेतो असे झाले. वर आल्यावर गुरूंनी विचारले, ‘कसे वाटले?’ तो म्हणाला,’मरता मरता वाचलो. केव्हा एकदा श्वास घेतो असे वाटले.’ गुरु म्हणाले, ‘मग असे ज्यावेळी ईश्वराबद्दल वाटेल ना तुला त्यावेळी साक्षात्कार होईल. असा जीवाचा तडफडाट होतो का तुझा? होत नाही?’ संदेह हेएक विघ्न आहे. ते टाकून द्या.