गिरनारवर जैन मंदिर, एका पीराचा दर्गा, गोरखनाथ मंदिर, शिवमंदिर, दोन देवीचीं मंदिरें व दत्तमंदिर अशी मंदिरे आहेत. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायर्या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायर्यांची चढ-उतार करावी लागते.
दत्तोपासनेच्या इतिहासांत गिरनारचा महिमा विशेष आहे. त्या तपोभूमीत दत्त दर्शनाचा घ्यास घेऊन तप आचरणारे अनेक ज्ञाताज्ञात महात्मे होऊन गेले. निरंजन रघुनाथ, किनाराम अघोरील नारायणमहाराज जालवणकर इत्यादी दत्तोपासकांना गिरनारवरच दत्त साक्षात्कार झाला आहे. अनंतसुत विठ्ठलाने ‘दत्तप्रबोधां’ त गिरनारचें माहात्म्य असें वर्णिलेलें आहे :
एक शृंगावरी गोरक्षनाथ । दुसरे शृंगावरी हिंगळजादेवी असत ।
|