अक्कलकोट


अक्कलकोट स्वामी समर्थ

अक्कलकोट स्वामी समर्थ


अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील लहानसे गाव आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे समाधी देवस्थान सोलापूरपासून फक्त ४५ कि. मी. अंतरावर असून असंख्य श्रद्धावानांचे पवित्र ठिकाण आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे नाथ पंथीय घोर तप करणारे स्वामी. त्यांनी वेगवेगळे जन्म घेतले आणि ते समाधी घेऊन आजही वेगळ्या रूपात आहेत, असे भाविक मानतात. समाधी स्थळ, शिवपुरी आश्रम ही येथील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. शिवपुरी आश्रमात सातत्याने अग्नी तेवत ठेवण्याचे शास्त्र – अग्निहोत्र- जतन केले आहे.