श्री कनकादित्य मंदिर, कशेळी


कनकादित्य मंदिर, कशेळी

कनकादित्य मंदिर, कशेळी


रत्नागिरी – आडीवरे – पूर्णगड या रस्त्यावरच कशेळी आहे. इ. स. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला. प्रभासपट्टण या श्रीकृष्णाच्या राहण्याच्या ठिकाणी सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या. हल्ला होणार अशी कुणकुण लागल्याने पुजार्‍याने दक्षिणेकडे जाणार्‍या एका व्यापार्‍याच्या गलबतावर मूर्ती चढवल्या. काही मूर्ती घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. ते गलबत कशेळीजवळ समुद्रकिनार्‍याजवळ अडकले. त्याने त्यातील एक मूर्ती गुहेत आणून ठेवली. नंतर जहाज पुढे गेले. गुहेतील ही मूर्ती लोकांनी किनार्‍यावरून गावात आणली. तेथे हे मंदिर उभे केले. तेच येथील कनकादित्य मंदिर होय.

मंदिरात सुबक कोरीव काम आहे. लाकडी प्रतिमा आहेत. कनकादित्याची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, चांदीचा रथ उत्सवाच्या वेळी पाहायला मिळतो. मंदिरात माघ शुद्ध सप्तमी ते माघ शुद्ध एकादशी असा पाच दिवस रथसप्तमी उत्सव असतो.

किनार्‍यावरील कड्यावर सुमारे १५ फूट उंचीवर, ४०० चौ. फुटांची नैसर्गिक गुहा आहे – तिथेच कनकादित्याची मूर्ती सापडली. या मंदिरात ८५० वर्षांपूर्वीचा एक ताम‘पट आहे. त्यावर संस्कृतमध्ये एक लेख कोरलेला आहे.

Leave a Comment