दत्ताचा जन्म चालू मन्वंतराच्या आरंभी प्रथम पर्यायातील त्रेतायुगात झाला,असे वर्णन पुराणांत आढळते.
पुराणांनुसार : अत्रिऋषींची पत्नी अनसूया ही महापतीव्रता होती. तिच्यापातिव्रत्याची परीक्षा घेण्याचे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी ठरवले. एकदाअत्रिऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णु आणि महेश) आले आणि अनसूयेकडे त्यांनी भोजन मागितले. अनसूयेने सांगितले,‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्तीअनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला अतिशय भूकलागली आहे. लगेच भोजन द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमातआलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता', असे आम्ही ऐकले आहे; म्हणूनइच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’ मग अनसूयेने त्यांचे स्वागत केलेआणि भोजनास बसण्याची विनंती केली. ते भोजनास बसले. ती भोजन वाढायलाआल्यावर ते म्हणाले, ‘‘तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस, अशी आमचीइच्छा आहे.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळआहे. माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींनाम्हणाली, ‘‘बरं ! तुम्ही भोजनास बसा.’’ मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे स्मरणकरून तिने ‘अतिथी माझी लहान बाळे आहेत’, असा मनात भाव ठेवला. नंतर पहातेतो अतिथींच्या स्थानी रडणारी तीन लहान बाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपानकरवले आणि बाळांचे रडणे थांबले.
इतक्यात अत्रिऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली,‘‘स्वामिन् देवेन दत्तम् ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली(मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. त्यानंतरअत्रिऋषींनी अंतज्र्ञानाने बाळांचे खरे रूप ओळखून त्यांना नमस्कार केला. बाळेपाळण्यात राहिली अन् ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणिप्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्रि आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. तो वर देऊन देव आपापल्या लोकामध्ये गेले.पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, श्रीविष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले.तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमेचंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. हेचगुरूंचे मूळपीठ.