पिठरं क्वथदतिमात्रं निजपार्श्वानेव दहतितराम् ||
अर्थ :
दुबळ्या माणसांचा संताप हा त्यांना स्वतःलाच त्रासदायक होतो. [जसे] अतिशय तापलेले पातेले त्याच्या जवळ असणार्यांनाच होरपळून टाकते.
सम्पूर्णोऽपि घटः कूपे गुणच्छेदात्पतत्यधः ||
अर्थ :
हे बन्धो, अतिशय श्रीमंत असलास तरी गुणांचे [संवर्धन करण्यात] दुर्लक्ष करू नकोस. घडा [विहिरीतून काढताना पाण्याने] पूर्ण भरला असला तरी गुण [गुण किंवा पोहोऱ्याचा दोर] तुटल्यास खाली कोसळतो.
मम राष्ट्रमानचिह्नं राष्ट्रध्वजं नमामि ||
अर्थ :
या जगामध्ये बंधुभाव [प्रेम] पसरो. [सत्याचा निश्चितपणे] विजय होवो. [मी] राष्ट्राचे मानचिह्न असणाऱ्या राष्ट्रध्वजाला वन्दन करतो.
सत्यं शिवं च हृद्यं , लब्धुं सदा प्रयतताम् ||
अर्थ :
अत्यंत निर्भय असे माझे मन तुझ्या [निरीक्षणात] नेहमी आनंदी होवो नेहमी शाश्वत सत्य, मनोहर कल्याण मिळवण्याचा प्रयत्न करो.
रुचिरं त्रिवर्णकान्तं, राष्ट्रध्वजं नमामि ||
अर्थ :
तेजस्वी अशा, तीन रंगानी शोभून दिसणाऱ्या, [खूप] उंचावर वाऱ्याच्या वेगामुळे फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाला मी वन्दन करतो.
क्षुत् स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ||
अर्थ :
गरीब लोक नेहमी अतिशय चांगल असं अन्न भक्षण करतात. कारण भूक ही सुंदर चव आणते की जि [गोष्ट] श्रीमंतांच्या बाबतीत दुर्मिळ असते.
मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः ||
अर्थ :
शिकत राहणाराला मूर्खपणाचा धोका नसतो. जप करणाराला पाप लागण्याचा धोका नसतो. मौन बाळगणाऱ्याला भांडणाची भीती नसते. दक्ष राहणार्याला कसलीच भीती नसते.
यो वै युवाप्यधीयानः तं देवाः स्थविरं विदुः ||
अर्थ :
ज्याचं डोकं म्हातारपणामुळे पांढरे झाले आहे त्याला देव वृद्ध म्हणत नाहीत तर जो तरुण असूनही [खूप] शिकलेला आहे त्याला वृद्ध असे म्हणतात.
अवश्यं लघुतां यान्ति कृष्णपक्षे यथा शशी ||
अर्थ :
जे मूर्ख लोक काही काम नसताना दुसऱ्याच्या घरी जातात, त्यांना कृष्णपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे क्षय पावतो त्याप्रमाणे नक्की कमीपणा येतो.
मोक्षं प्रवृत्तिसुलभं प्रदिशन्तमत्र प्रत्नं नमामि पुरुषं धृतबालभावम् ||
अर्थ :
उत्साह मुळीच नसलेल्या, कर्तव्ये करावी [की संन्यासात सुख मानावे अशा गोंधळात पडलेल्या], निराश अशा [अर्जुनाला – भारतीय जनतेला] पाहून प्रवृत्तिपर मोक्षाच्या मार्गाचा, प्रयत्नवादाचा उपदेश करणाऱ्या, बाळ [नाव धारण करणाऱ्या – पक्षी बाल – निष्पाप अशा] पुरुषाला [टिळकाना, श्रीकृष्णाला मी] वन्दन करतो.
स्वावलम्बो दृढाभ्यासः षडेते छात्रसद्गुणाः ||
अर्थ :
उद्योगीपणा, ब्रह्मचर्य, उत्तम चारित्र्य, शिक्षकांबद्दल आदर, स्वावलंबन, सतत अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे सहा गुण आहेत.
न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वाऽलौकिकॉऽपि || (शङ्कराचार्य – शतश्लोकी)
अर्थ :
या त्रिभुवनात ज्ञानदात्या सद्गुरुना शोभेल असा दृष्टान्तच नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तर [तर तीही योग्य नाही], कारण अहो, जरी परिस लोखंडाला सुवर्णत्व देतो तरी परिसत्व देत नाही. [परंतु ]सद्गुरू चरणयुगुलांचा आश्रय करणाऱ्या आपल्या शिष्याला स्वतःचे साम्य देतात आणि त्यामुळेच ते निरुपम आहेत आणि त्यांना योग्य असा दृष्टान्त प्रपंचात मिळत नाही.
यस्योभयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतीष्ठापयितव्य एव || (कालिदास – मालविकाग्निमित्र)
अर्थ :
कोणाला [एखाद्या शिक्षकाला] स्वतःचे ज्ञान प्रशंसनीय असते. कुणाला शिकवण्याची हातोटी उत्तम असते. ज्याला या दोनही गोष्टी चांगल्या येतात त्याला निश्चितपणे अग्रस्थान दिले पाहिजे.