१. गणपतिस्तोत्राच्या पारायणाचे लाभ
१. मनाची एकाग्रता वाढते.
२. एक-दोनदा वाचूनही लक्षात रहाते. थोडक्यात स्मरणशक्ती वाढते.
३. गणपती ही बुद्धीची देवता असल्याने बुद्धी सात्त्विक व सूक्ष्म होते.
– प.पू. पांडे महाराज
श्री संकष्टनाशन गणपतिस्तोत्रऐकण्यासाठी येथे क्लिक करा !
२. श्री गणेशस्तोत्राचे पारायण करण्याची पद्धती
१. पूर्व दिशेला तोंड करून आसनावर बसावे.
२. शक्य असल्यास पद्मासन अथवा सुखासनात बसावे.
३. अर्धा पेला पाणी घेऊन त्यात थोडी विभूती घालावी.
४. गणपतीला मनापासून प्रार्थना करावी.
५. श्री गणपतीस्तोत्रातील श्लोक क्र. २ ते ४ (`प्रथमं वक्रतुंडच ‘पासून `द्वादशन् तू गजानन’ पर्यंत) ११० वेळा म्हणावे.
६. १११ व्या वेळेला पूर्ण गणपतीस्तोत्र म्हणावे.
७. शेवटी गणपतीला मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी.
८. अर्ध्या तासात हे पारायण पूर्ण होते. त्यानंतर श्रद्धापूर्वक तीर्थ (पेल्यातील विभूतीचे पाणी) प्राशन करावे.
वरीलप्रमाणे गणपतिस्तोत्राचे पारायण ११ दिवस करावे.