स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता केशा नखा नराः ।
इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत् ॥
अर्थ : दात, केस, नखे आणि माणसे त्यांच्या (योग्य) जागेवरुन हलल्यास (पडल्यास) त्यांची शोभा जाते. हे जाणून विद्वान माणसाने आपली जागा सोडू नये.
बहूनामप्यसाराणां समावायो हि दुर्जय: |
तृणैर्निमीयते रज्जु: येन नागोऽपि बध्यते ||
अर्थ : जरी अगदी क्षुल्लक वस्तू असल्या तरी त्यांचा गठ्ठा असल्यास तो जिंकणे फार कठीण असते. अगदी [साध्या] गवतापासून बनवलेल्या दोरीने [अतिविशाल] असा हत्ती सुद्धा बांधला जातो.
नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः ।
अन्ये च बदरीकाकारा बहिरेव मनोहराः ॥
अर्थ : सज्जन माणसे नारळासारखी असतात (बाहेरुन कठीण पण आतुन मृदु). पण दुसरे (दुर्जन) मात्र, बोरासारखे फक्त बाहेरुन सुंदर असतात. (आणि आतुन मात्र किडके)
स्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा ।
सुतप्तमपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम् ॥
अर्थ : उपदेश करुन स्वभाव बदलता येत नाही. जसे, पाणी चांगले तापवले तरी नंतर गारच होते.
दुर्जनेन समं सख्यं प्रीतिं चापि न कारयेत् ।
उष्णो दहति चाङ्गारः शीतः कृष्णायते करम् ॥
अर्थ : दुर्जन माणसाबरोबर मैत्री किंवा प्रेम करु नये. जसे, कोळसा गरम असतांना चटका देतो आणि गार झाल्यावर हात काळा करतो. [दुष्टांशी कसाही सबंध आला तरी त्रासच होतो]
तातेन लिखितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया |
न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लङघिता ||
अर्थ : वडिलांनी लिहिले ‘बाळ, माझी आज्ञा आहे म्हणून पत्र लिही’. नम्र अशा त्याने पत्र लिहिले आणि वडिलांची आज्ञा मोडली नाही.
हा प्रहेलिका प्रकारचा श्लोक आहे. त्याने पत्र लिहिले नाही. वडिलांची आज्ञा मोडली नाही. नतेन एकत्र घेतला की नम्र अशा त्याने पत्र लिहिले असा अर्थ होतो.
छिन्नोऽपि रोहति तरुश्चन्द्र: क्षीणोऽपि वर्धते लोके |
इति विम्रृशन्त: सन्त: संतप्यन्ते न ते विपदा ||
अर्थ : या जगामध्ये झाड तोडले तरी पुन्हा वाढते. दुर्बल झालेला चंद्र सुद्धा [पूर्ण ] होतो. असा विचार करून सज्जन लोक संकटाने खचून जात नाहीत.
सर्प: क्रूर: खल: क्रूर: सर्पात् क्रूरतर: खल: |
सर्प: शाम्यति मन्त्रेण; न शाम्यति खल: कदा ||
अर्थ : साप हा क्रूर असतो. दुष्ट मनुष्य हा पण क्रूर असतो. [पण] दुष्ट हा सापापेक्षा क्रूर असतो. [ अस म्हणायचं कारण ] सापाचं [विष ] शान्त करता येतं. [औषधांनी दुष्परिणाम घालवता येतात ] पण दुष्ट कधी शान्त बसत नाही. [त्रास देतच राहतो]
कर्णामृतं सूक्तिरसं विमुच्य दोषेषु यत्न: सुमहान्खलस्य |
अवेक्षते केलिवनं प्रविष्ट: क्रमेलक: कण्टकजालमेव ||
अर्थ : कानांना सुख देणारा चांगल्या बोलण्याचा [सुंदर] अर्थ सोडून त्यातले दोष शोधण्याचाच दुष्ट मनुष्य प्रयत्न करतो. केळ्याच्या मोठ्या बागेत शिरलेला उंट [गोड केळी खायची सोडून] काट्यांचा पुंजकाच शोधतो.
दानं भोगो नाश : तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य |
यो न ददाति न भुङक्ते तस्य तृतीया गतिर्भवति ||
अर्थ : पैशाला दान [करणे ] उपभोग [घेणे ] आणि नष्ट होणे अशा तीन वाटा असतात. जो दान करीत नाही आणि उपभोगही घेत नाही त्याचे धन नाश पावते.