संस्कृत सुभाषिते : ७

कस्यापि कॉऽप्यतिशयोऽस्ति स तेन लोके ख्यातिं प्रयाति नहि सर्वविदस्तु सर्वे |



किं केतकी फलति किं पनसः सपुष्पः किं नागवल्ल्यपि पुष्पफलैरुपेता ||

अर्थ : कुणाचहि एखाद्या गोष्टीत पराकोटीच कौशल्य असत आणि त्यामुळे तो प्रसिध्द होतो. माणूस सर्वज्ञानी नसतो. केवड्याला फळे लागतात काय ? [ त्याच्या पानाच्याच सुगंधाने तो प्रसिध्द होतो. ] फणसाला फुले येतात काय? आणि विड्याच्या पानाचा वेलाला फळे फुले नसतात मुळी.

अर्थो हि कन्या परकीय एव तामद्य संप्रेष्य परिग्रहीतुः |


जातो ममायं विशदः प्रकामं प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा ||

अर्थ : मुलगी हे दुसऱ्याचे [ तिच्या पतीचीच ] संपत्ती आहे. तिला पतिगृही पाठवून आज मला [कन्याविरहाचे] खूप दुःख होत आहे. पण ठेव परत केल्याप्रमाणे अन्तःकरण झाले आहे.

शाकुन्तलामध्ये कण्व मुनी शकुंतलेला सासरी पाठवल्यावर म्हणतात.

खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया |


उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम् ||

अर्थ : दुष्ट मनुष्य आणि काटे यांचा दोन प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेनी फोडून काढणं किंवा दुरूनच टाळून जाणे.

उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवं प्रधानमिति कापुरुषा वदन्ति |


दैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कॉऽत्र दोषः ||

अर्थ : [नेहमी] काम करणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी [स्वतः] येते. सामान्य लोक नशीब हेच महत्वाचे आहे असे म्हणतात. [त्यापेक्षा] स्वतःच्या ताकदीने प्रयत्न करावे. प्रयत्न करूनही जर यश मिळालं नाही तर त्यांचा [सामान्य लोकांचा] काय दोष ?

नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः |


गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा ||

अर्थ : सौन्दर्य हा माणसाचा दागिना आहे. गुण हा रूपाचा अलंकार आहे. ज्ञान हा गुणाचा अलंकार आहे. क्षमशीलता हा ज्ञानाचा अलंकार आहे.

दाता क्षमी गुणग्राही स्वामी दुःखेन लभ्यते |


शुचिर्दक्षोऽनुरक्तश्च जाने भ्रृत्योऽपि दुर्लभः ||

अर्थ : [मला असे वाटते कि] उदार, क्षमशील, गुणांची कदर करणारा मालक मिळणे कठीण आहे आणि पवित्र [शुद्ध आचरण असणारा ] दक्ष आणि [धन्यावर ] प्रेम करणारा नोकरसुद्धा दुर्मिळ असतो.

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः|


या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात्विनिसृता ||

अर्थ : कमल ज्याच्या नाभीमधून उगवलं अशा भगवान [श्रीकृष्णाच्या] मुखकमालातून स्रवलेली गीता चांगली पाठ करावी. दुसऱ्या शास्त्र ग्रंथांची [पोथ्यापुराणांची] जरूरच काय? [गीता हा एकच ग्रंथ आपली अध्यात्मिक उन्नती साधण्यास पुरेसा आहे.]

लुब्धं वशं नयेदर्थैः क्रुद्धं चाञ्जलिकर्मणा |


मूर्खं छन्दानुरोधेन याथातथ्येन पण्डितम् ||

अर्थ : हावरट माणसाला [पुष्कळ] धन [देऊन] वश करावे. रागावलेल्याला हात जोडून शान्त [वश] करावे. मूर्खाला त्याच्या कलाने वागून वश करावे आणि विद्वानाला योग्य गोष्ट करण्याने वश करता येते.

अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका |


तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः ||

अर्थ : अगदी लहान वस्तूंच्या समूहामुळे काम होऊन जाते. [अगदी कमी मजबुती असलेल्या ] गवताचा दोर वळला की त्याने माजलेले हत्ती [एवढे शक्तिमान असूनही ] सुद्धा बांधता येतात.

Leave a Comment