सकाळी उठल्यावर नामस्मरण, श्रोत्राचमन, गणेशवंदन, करदर्शन, भूमीवंदन करणारे श्लोक म्हटल्यास त्याचा लाभ होतो.
१. श्रोत्राचमन
झोपेतून उठल्याउठल्या अंथरुणात बसून श्रोत्राचमन करावे. श्रोत्राचमन म्हणजे उजव्या कानाला हाताने स्पर्श करून श्रीविष्णूची ‘ॐ केशवाय नमः ।, ॐ नारायणाय नमः ।, ॐ माधवाय नमः ।, ॐ गोविंदाय नमः ।, ॐ विष्णवे नमः ।, ॐ मधुसूदनाय नमः ।, ॐ त्रिविक्रमाय नमः ।, ॐ वामनाय नमः ।, ॐ श्रीधराय नमः ।, ॐ हृषीकेशाय नमः ।, ॐ पद्मनाभाय नमः ।, ॐ दामोदराय नमः ।, ॐ संकर्षणाय नमः ।, ॐ वासुदेवाय नमः ।, ॐ प्रद्मुम्नाय नमः ।, ॐ अनिरुद्धाय नमः ।, ॐ पुरुषोत्तमाय नमः ।, ॐ अधोक्षजाय नमः ।, ॐ नारसिंहाय नमः ।, ॐ अच्युताय नमः ।, ॐ जनार्दनाय नमः ।, ॐ उपेंद्राय नमः ।, ॐ हरये नमः ।, ॐ श्रीकृष्णाय नमः ।’ अशी २४ नावे म्हणावीत.
आदित्य, वसु, रुद्र, अग्नि, धर्म, वेद, आप, सोम, अनील इत्यादी सर्व देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने नुसता स्पर्श केला, तरी आचमनाचे फळ मिळते. आचमनाने अंतर्शुद्धी होते.
२. श्री गणेशवंदन करणारा श्लोक म्हणणे
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
अर्थ : दुर्जनांचा नाश करणार्या, महाकाय अशा (शक्तीमान) कोटी सूर्यांचे तेज असलेल्या (अतिशय तेजःपुंज) गणेशा, माझी सर्व कामे नेहमी कोणतेही विघ्न न येता (निर्विघ्नपणे) पार पडू देत.
३. करदर्शन
दोन्ही हातांची ओंजळ करून त्यामध्ये मन एकाग्र करून पुढील श्लोक म्हणावा.
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे अन् मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यावे.
(पाठभेद : हाताच्या मूळ भागात ब्रह्मा आहे.)
श्लोकाचा भावार्थ
अ. लक्ष्मीचे महत्त्व : ‘हाताच्या अग्रभागावर (कराग्रे) लक्ष्मी आहे, म्हणजे बाह्य भौतिक भाग हा लक्ष्मीरूपाने विलसत आहे. म्हणजे भौतिक व्यवहारासाठी लक्ष्मीची (धनाचीच नव्हे, तर पंचमहाभूते, अन्न, वस्त्र इत्यादींची) आवश्यकता आहे.
आ. सरस्वतीचे महत्त्व : धन किंवा लक्ष्मी नसेल, तर लक्ष्मी अलक्ष्मी ठरून नाशाला कारणीभूत होते; म्हणून सरस्वतीची आवश्यकता आहे.
इ. सर्वकाही गोविंदच असणे : गोविंद हाच सरस्वतीरूपाने मध्यभागी आणि लक्ष्मीरूपाने अग्रभागी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात शिव-पार्वती स्तवनात म्हणतात, ‘मूल, मध्य आणि अग्र हे तिन्ही वेगळे दिसत असले, तरी या तिन्हींमध्ये गोविंदच त्या स्वरूपातून कार्य करीत आहे. जवळजवळ सर्वच उद्योग हाताच्या बोटांच्या अग्रभागाने होतात; म्हणून तेथे लक्ष्मीचा वास आहे; परंतु त्या हातात मूल स्रोतातून येणारा अनुभवी ज्ञानाचा कार्यही करू शकत नाही.’ – परात्पर गुरु परशराम पांडे महाराज
४. भूमीवंदन
‘कराग्रे वसते लक्ष्मीः …’ हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे.
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥
अर्थ : समुद्ररूपी वस्त्र धारण करणार्या, पर्वतरूपी स्तन असणार्या आणि भगवान श्रीविष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वीदेवी, मी तुला नमस्कार करतो. तुला माझ्या पायांचा स्पर्श होणार आहे, त्यासाठी तू मला क्षमा कर.
भूमीला प्रार्थना करून भूमीवर पाऊल टाकल्याने रात्रीच्या वेळी तमोगुणाच्या साहाय्याने भारित झालेल्या देहातून वाहणार्या त्रासदायक स्पंदनांचे भूमीत विसर्जन होण्यास साहाय्य होते.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्नानपूर्व आचारांमागील शास्त्र‘