गणपतीचा नामजप

श्री गणेशाचा नामजप !

         देवतेबद्दल भक्तिभाव निर्माण झाल्यानंतर देवतेचे नाम कसेही घेतले तरी चालते; पण भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी व देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. भक्‍तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. श्री गणेशाचा नामजप कसा करावा, हे येथे ऐकूया.

नामजप भावपूर्ण करावा !

         देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते.

         ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ या नामजपातील ‘ॐ’ हे ईश्‍वरवाचक आहे आणि ‘गँ ‘ हा मूळ बीजमंत्र आहे. बीजमंत्र ‘गँ ’ हे अक्षर ईश्‍वराच्या निर्गुण रूपाचे प्रतीक आहे, तर ‘गणपतये’ ही अक्षरे ईश्‍वराच्या सगुण रूपाची प्रतीक आहेत. ‘नमः’ म्हणजे नमस्कार करतो.

         ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळूवारपणे म्हणावा. या वेळी ‘आपण श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत’, असा भाव ठेवावा. ‘गणपतये’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘नमः’ हा शब्द म्हणावा.  गणपतीचा नामजप हा प्राणशक्ति वाढविणारा आहे. प्राणशक्ति वाढून उत्साह प्राप्त होतो.

         येथे सांगितल्याप्रमाणे आपल्यालाही शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री गणेशाचा नामजप करून अनुभूती  घेता येवो, अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे.

         येथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा गणेश चतुर्थीला श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते; म्हणून या तिथीला ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा आणि गणेशतत्त्वाचा लाभ करून घ्यावा.

सनातन-निर्मित नामपट्टी



गणपति अथर्वशीर्ष ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !



श्री गणपतीची आरती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment