कृपा करी पंढरीनाथा । दीनानाथ तूं समर्था ॥ १ ॥
अपराध करीं क्षमा । तुझा न कळे महिमा ॥ २ ॥
करीं भक्ताचा सांभाळु । अनाथाचा तूं कृपाळु ॥ ३ ॥
आम्ही बहुत अन्यायी । क्षमा करी विठाबाई ॥ ४ ॥
आलों पतीत शरण । पावन करीं नारायण ॥ ५ ॥
पापी अमंगळ थोर । कृपा करीं दासावर ॥ ६ ॥
मी तरी अवगुण बहुत । दयाकरीं पंढरीनाथ ॥ ७ ॥
दयासागरा अनंता । कृपा करीं पंढरिनाथा ॥ ८ ॥
तुझें नामामृत सार । नरहरि जपे निरंतर ॥ ९ ॥