गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।
– श्री बृहन्नारदीय पुराण, पूर्वभाग, पाद १, अध्याय २७, श्लोक ३३
अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधु आणि कावेरी, तुम्ही सर्व नद्यामाझ्या स्नानाच्या पाण्यात या.
नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपाम् ।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।।
अर्थ : सर्व ऐहिक सुख, भोग आणि मोक्ष देणार्या हे गंगामाते, प्रत्येकाच्या भावानुसारतुझे जे चरणकमल सर्व देव आणि दैत्य यांना वंदनीय आहेत, अशा तुझ्या चरणांना मीवंदन करतो.
गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि ।
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति ।।
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति ।।
तीर्थराजाय नमः ।
अर्थ : शेकडो मैल (योजने) दुरून जो कोणी ‘गंगा, गंगा, गंगा’, असे गंगेचेस्मरण करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णुलोकी जातो.
गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी ।
पूर्णाःपूर्णजलैःसमुद्रसहिताःकुर्वन्तु मे मंगलम् ।।
अर्थ : गंगा, सिंधु, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेन्द्रतनया,चंबळा, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (माळव्यातील बेतवा नदी), प्रख्यात महासुरनदी, जयाअन् गण्डकी या नद्या, पवित्र आणि परिपूर्ण होऊन समुद्रासहित माझे कल्याण करोत.