१. सोमनाथ –सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहीसा होण्याकरितासोमाने(चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
२ . मल्लिकार्जुन – गुंटकल बेसवाडा या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून २८मैलांवर असलेल्या आत्माकुमार गावाला मोटारीने जावेलागते. आत्माकुरहून मल्लिकार्जुन ४३मैलश्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकरीता (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथेआले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
३. महाकालेश्वर –उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. हे शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.
४. ओंकारेश्वर –ओंकारमांधाताउज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठीआहे. हेनर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानेआहेत. दुसरेॐकार या नावाचेलिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असेहीम्हणतात.
५ . वैजनाथ –शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैजनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यात पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैजनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीकुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितापुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतेहेज्योतिर्लिगाचेस्थान आहे. दक्षिणेत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैजनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथाचेस्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
६ . भीमाशंकर –खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीरस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानेराक्षसाचा वध केल्यामुळेभीमाशंकर नाव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतात कामरूप जिल्ह्यात उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नावाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला काहीलोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथेएका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचेआणि दोन पुरुष उंचीचेलिंग आहे. त्यालाच काहीलोक भीमाशंकर म्हणतात.
७. रामेश्वर –दक्षिण भारतात प्रसिद्धच आहे. प्रभू रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळेयाला असेनाव पडले.
८ . नागेश्वर –श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणेद्वारकेजवळचेलिंग तें हेच ज्योतिर्लिग होय, असेबर्याच लोकांचे म्हणणेआहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढानागनाथ हेच नागेश ज्योतिर्लिंग होय, असेदक्षिणेतील लोकांचे म्हणणेआहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागते. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हेस्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
९ . काशीविश्वेश्वर –जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो.
१० . त्र्यंबकेश्वर –नाशिकहून वीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथेआली व शंकर लिंगरूपानेआले.
११ . केदारेश्वर –हिमालयावर हरिद्वारहून केदारेश्वर १५० मैल आहे. केदारनाथाचेदेऊळ वैशाख ते आश्विन उघडेअसते. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तेबर्फांत बुडालेलेअसल्यामुळे बंद असते.
१२ . घृष्णेश्वर –दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नावाचेसरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथेस्थिर झाले.