माहूर – देवी रेणुकामाता


श्री रेणुका देवी (माहुर)

श्री रेणुका देवी (माहुर)


महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिदेवतांपैकी माहूरची रेणुकादेवी एक. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्‍यात माहूरगडासमोर हे ठिकाण आहे. रेणुकादेवीचे फक्त शिर दिसते, धड नाही. रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व महापराक्रमी परशुरामाची आई. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.

देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. रेणुकेचे मंदिर लहानसे असून प्रवेशाचा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजावर नगारखाना आहे. देवीला खलबत्त्यात पान कुटून नैवेद्य दाखवितात. नवरात्रीत येथे नऊ दिवस मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरा केला जातो. यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रीच्या काळात आणि एरव्हीही दागिन्यांनी नटलेली असते.

तेथे रेल्वेने जाणे सर्वाधिक सोईचे आहे. रेल्वेने जाताना किनवट स्थानकावर उतरावे लागते. तेथून ५५ किलोमीटर अंतरावर माहूर आहे. रेणुका देवीला अनेक ठिकाणी विशेषतः कर्नाटकात यल्लमा नावानेही ओळखले जाते. रेणुकादेवीबरोबरच परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनसूया मंदिर, कालिका माता मंदिर इत्यादी धार्मिक स्थळेही आहेत. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. हे स्थान नाशिक जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे.

Leave a Comment