देवळात तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या अयोग्य वर्तनामुळे तेथील पावित्र्य नष्ट होणार नाही, याची काळजी घ्या. आपल्यामुळे पावित्र्य नष्ट झाले, तर आपल्याला पाप लागेल अन् जर आपण पावित्र्य राखले, तर आपल्याला देवाचा आशीर्वाद लाभेल. यासाठी हे करा –
अ. देवालयाच्या ठिकाणी मोठ्याने बोलणे, खेळणे, ‘मोबाईल’वर बोलणे आदी करू नका !
आ. दर्शनासाठी रांगेत उभे असतांना मनातल्या मनात देवाचा नामजप किंवा प्रार्थना करा !
इ. देवळाच्या आवारात वहाणा घालू नका. त्या जागेला ‘सहलीचे ठिकाण’ समजू नका !
ई. प्रसादपुडीचे वेष्टन, केळीची साले, नारळाची करवंटी आदी देवालयाच्या आवारात टाकू नका, तसेच अशा गोष्टी वा अन्य कचरा आवारात आढळल्यास तेथील स्वच्छता करा !
‘देवळे आणि तीर्थक्षेत्रे, हा हिंदु धर्माचा आत्मा आहे’, हे विसरू नका !