हिंदु जनजागृती समितीची ‘मान्यवर’ ब्रँडला चेतावनी
हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. तसेच विवाह विधींतील ‘कन्यादान’ हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. असे असतांना नुकताच ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीने ‘मान्यवर’ या प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडची एक जाहिरात प्रसारित केली आहे, त्यामध्ये ‘कन्यादान’ कसे चुकीचे आहे, तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का’ असे प्रश्न उपस्थित करत ‘आता कन्यादान नव्हे, तर कन्यामान’ असा परंपरा बदलण्याचा संदेश दिला आहे. ही जाहिरात हिंदु धर्मातील धार्मिक कृतींचा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार करणारी, धार्मिक कृतींचा अपमान करणारी आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. हिंदु जनजागृती समिती या जाहिरातीचा निषेध करते. हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी मुळातच कन्येचा सन्मान करणारा अर्थातच ‘कन्यामान’ आहे. त्यामुळे ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ला या कंपनीने ही जाहिरात त्वरित मागे घेऊन हिंदूंची बिनशर्त क्षमायाचना करावी. जोवर असे होत नाही, तोवर ‘हिंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा’ असे आम्ही आवाहन करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कळवले आहे.
Recently fashion brand @Manyavar_ came up with a new advertisenent that featured @aliaa08. The ad says let's do away with the 'Kanyadan' and let's start with the 'Kanyaman'
So with this ad, these people want to prove that Hindu Dharma is 'regressive' ! 1/2#Boycott_Manyavar pic.twitter.com/J792JUsd9F
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) September 22, 2021
या जाहिरातीमधून ‘कन्यादान’ विधी हा एकप्रकारे महिलांचा अपमान असल्याचे दर्शवले आहे. मुळात या विधीद्वारे कन्यादान करताना वराकडून वचन घेतले जाते. कन्या काही वस्तू म्हणून दिली जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना सांगतात, ‘विधात्याने मला दिलेले वरदान, जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली, ती तुझ्या हाती सोपवत आहे. ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चारही बाबतीत तिची प्रतारणा करू नकोस आणि तिच्याशी एकनिष्ठ राहा आणि दोघांनी सुखाचा संसार करा.’ त्यावर ‘नातिचरामि’ म्हणत वर म्हणतो, ‘तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही.’ इतका श्रेष्ठ असा हा विधी तथाकथित पुरोगामीपणा दाखवत हेतूतः बुद्धीभेद करून हिंदु धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
हिन्दू धर्म का ‘कन्यादान’,‘कन्यामान’ ही है; ‘मान्यवर’ ब्रांड हिन्दुओं से क्षमा मांगकर विज्ञापन हटाए अन्यथा बहिष्कार ! – @HinduJagrutiOrg की @manyavar_ ब्रांड को चेतावनी
यह विज्ञापन हिन्दू धर्म की धार्मिक कृतियों का अनुचित अर्थ बताकर दुष्प्रचार करता है ।
#Boycott_Manyavar pic.twitter.com/CzbJM8LIJp
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) September 22, 2021
हिंदु धर्मात स्त्रियांचा जेवढा सन्मान दिला आहे, तो जगभरातील कोणत्याही धर्मात दिला गेलेला नाही; किंबहुना काही प्रस्थापित धर्मांत तर स्त्रीला मानव म्हणूनही वागणूक दिली जात नाही. हिंदु धर्मात स्त्रीला देवीचे स्थान दिले आहे. तिचे पूजन केले जाते. पत्नीशिवाय धार्मिक विधींना आरंभच होऊ शकत नाही. तरी हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. सद्यस्थितीत ‘हलाला’, ‘तिहेरी तलाक’, ‘बहुपत्नीत्व’ या प्रथा, तसेच ‘स्त्री ही सैतान आहे’ असे मानणारी विचारसरणी अस्तित्त्वात आहे, याबाबत कोणी जाहिरात तर सोडा, साधा निषेध करायलाही पुढे येत नाहीत. सामाजिक स्वास्थ टिकून रहावे, म्हणून ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ कंपनीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि जाहिरातींसाठीही ‘सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करावे, अशी मागणीही केंद्र सरकारकडे करणार असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.
‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची क्षमा मागून ‘कन्यादाना’विषयीचे आक्षेपार्ह विज्ञापन मागे घ्यावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी
वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ दुकानाच्या बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !
वाशी – ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असे धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारे विज्ञापन केले. ते अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरत आहे. या विज्ञापनामुळे व्यापक आणि उच्च मूल्य जोपासणार्या धार्मिक विधीविषयी लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आला आहे. या विज्ञापनाचा निषेध म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने केली आहेत. ‘वेदांत फॅशन्स लि.’ आस्थापनाने हिंदूंची बिनशर्त क्षमा मागून ‘मान्यवर’ ब्रँडचे हे विज्ञापन त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी या वेळी केली. वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ दुकानाच्या समोर झालेल्या निदर्शनांत विविध हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. त्यात ते बोलत होते. ‘शिव माऊली’ सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष राहुल यादव हेही या वेळी उपस्थित होते.
या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह हिंदु धर्मप्रेमींनी हातात निषेध फलक धरून लोकांमध्ये जागृती केली. ‘हे विज्ञापन मागे घेऊन जोपर्यंत क्षमा मागत नाही, तोपर्यंत हिंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा’, असे आवाहनही या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले.
वाशी, नवी मुंबई स्थित @Manyavar_ शो रुम के बाहर हिन्दुत्वनिष्ठ संगठनों का प्रदर्शन !
‘मान्यवर’ ब्रांड हिन्दुओं से क्षमा मांगकर ‘कन्यादान’ का आपत्तिजनक विज्ञापन हटाएं । – हिन्दुत्वनिष्ठ संगठनों की चेतावनी#Hinduhater_Bollywood pic.twitter.com/nLmbCOyrAh
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) September 25, 2021
विज्ञापन मागे न घेतल्यास हिंदु जनजागृती समितीची तीव्र आंदोलनाची चेतावणी !
‘मान्यवर’ने प्रसारित केलेल्या विज्ञापनातून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले असून ‘कन्यादान’ कसे चुकीचे आणि प्रतिगामी आहे, तसेच ‘दान करायला कन्या ही काय वस्तू आहे का ?’, असे संभ्रम निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ‘कन्यादान’ नको, तर कन्यामान म्हणा’, अशा प्रकारे थेट परंपरा पालटण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘मान्यवर’ ब्रँडचे विज्ञापन मागे न घेतल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल’, असेही डॉ. धुरी यांनी या वेळी सांगितले.
‘मान्यवर’ दुकानाच्या व्यवस्थापकांकडून हिंदूंच्या भावना व्यवस्थापनापर्यंत पोचवण्याचे आश्वासन !
या वेळी ‘मान्यवर’ दुकानाचे व्यवस्थापक नरसिंग सिंग यांना धुरी यांनी निवेदन देऊन या विज्ञापनाविषयी हिंदूंच्या असलेल्या तीव्र भावनांची जाणीव करून दिली. त्यावर सिंग यांनी ‘तुमचे म्हणणे मी व्यवस्थापनापर्यंत पोचवतो’, असे आश्वासन दिले.