Menu Close

#BoycottAmazon : अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळाकडून हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या पायपुसण्यांची विक्री; हिंदूंचा विरोध !

अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा अनादर करण्याचे धाडस अ‍ॅमेझॉनने केले असते का ? हिंदूंनो, तुमच्या देवतांचा अवमान करणार्‍या संकेतस्थळावरील वस्तूंवर बहिष्कार घालून त्यांना हिंदु ऐक्याची चुणूक दाखवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे अमेरिकेतील संकेतस्थळ अ‍ॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या पायपुसण्यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. भारतातील हिंदूंनी यास विरोध दर्शवला आहे. ट्विटर वरून बायकॉट अ‍ॅमेझॉन नावाचा ट्रेंड चालू करून त्याद्वारे अ‍ॅमेझॉनवर टीकेची झोड उठण्यात येत आहे. एका घंट्यात १२ सहस्र लोकांनी वरील संकेतस्थळाच्या विरोधात ट्विट केले.

धर्माभिमानी हिंदु खालील पत्त्यावर आपला निषेध नोंदवत आहेत :

र्इमेल – [email protected]
संपर्क क्रमांक : +91-80-41970000
कार्यालयीन पत्ता : ब्रिगेड गेट वे, ८ वा मजला, २६/१,
डॉ. राजकुमार रोड, मल्लेश्वरम (पश्चिम),
बैंगलुरु – ५६००५५, कर्नाटक, भारत

यात काही जणांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

१. डॉ. श्रद्धा : अ‍ॅमेझॉन जीझसचे चित्र छापण्याचे धाडस करू शकतो का ? असे करणारे पैसे घेण्यासाठी जिवंत तरी रहातील का ?

२. रामराव कुलकर्णी : अ‍ॅमेझॉनने विसरू नये की, विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या स्नॅपडीलचा ब्रण्ड अ‍ॅण्बेसिडर असणार्‍या अमीर खानची काय स्थिती झाली होती.

३. उदीप्ता बोरा : जोपर्यंत अ‍ॅमेझॉन क्षमा मागत नाही तोपर्यंत त्याच्यावर बहिष्कार चालूच राहिल !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *