Menu Close

गोवंडी (मुंबई) येथे हिंदु धर्माभिमानी विष्णु गुप्ता यांच्यावर धर्माधांकडून जीवघेणे आक्रमण !

  • धर्मांधांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून हिंदूंच्याच विरोधात गुन्हा नोंद !

  •  धर्मांधांचा उद्दामपणा आणि पोलिसांचा नाकर्तेपणा यांमुळे मुंबईतही आता हिंदूंवर घरदार सोडून जाण्याची वेळ !

महाराष्ट्रातही आता छोटे छोटे पाकिस्तान निर्माण होत असल्याचे हे उदाहरण आहे ! महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशी आक्रमणे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई न करता उलट हिंदूंवरच गुन्हा नोंदवणारे पोलीस हिंदुद्वेषीच होय ! हिंदूंना सन्मानाने जगायचे असेल, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविना पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

dharmandh2मुंबई : येथील बैगनवाडी गोवंडी या मुसलमानबहुल भागात रहाणारे धर्माभिमानी श्री. विष्णु गयाप्रसाद गुप्ता यांच्यावर शुल्लक कारणावरून धर्मांधांनी तलवारीने जीवघेणे आक्रमण केले. या प्रकरणी हिंदूंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आक्रमणकर्त्यांवर कारवाई करायची सोडून धर्मांधाच्या खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी हिंदूंवरच गुन्हा दाखल. धर्मांधांचा उद्दामपणा आणि पोलिसांचा नाकर्तेपणा यांना कंटाळून काही मासांपूर्वी येथील श्री. गणेश गुप्ता आणि श्री. शिवमुरत गुप्ता हे घर सोडून अन्य भागात निघून गेले आहेत.
धर्मांधांकडून सततच्या होणार्‍या त्रासामुळे हिंदू कुटुंबियांना येथे रहाणे कठीण झाले आहे. त्यामुळे येथील अन्य हिंदु कुटुंबेही घर सोडून जाण्याच्या सिद्धतेत आहेत. (देशात बहुसंख्य असूनही काश्मीरमधून हिंदूंना परागंदा व्हावे लागले. आता अशीच स्थिती देशातील अन्य भागांतही निर्माण होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. ४ एप्रिल या दिवशी काही धर्मांध युवक क्रिकेट खेळत असतांना त्यांचा चेंडू श्री. विष्णु गुप्ता यांच्या दुकानात गेला. श्री. गुप्ता यांनी चेंडू देण्यास नकार दिला. यावर आसिफ शेख (वय २० वर्षे) यासह अन्य धर्मांध युवकांनी श्री. गुप्ता यांना फळीने (बॅटने) मारले. याविषयी श्री. गुप्ता यांनी धर्मांधांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता धर्मांध आसिफ शेख याने मेरे बाप को गाली दी, तेरे को पक्का मारूंगा, अशी गुप्ता यांना धमकी दिली. ५ मेच्या रात्री १० वाजता श्री. गुप्ता दुकान बंद करत असतांना तोंडाला काळे कापड बांधून आलेल्या ३ धर्मांध युवकांनी श्री. गुप्ता यांच्यावर तलवारीने वार केले.

२. श्री. गुप्ता यांच्यावरील आक्रमणाविषयी हिंदूंनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आक्रमणकर्त्यांवर तत्परतेने कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी ज्याला मारहाण झाली, त्याला घेऊन या, असा सल्ला दिला. प्रत्यक्षात मात्र श्री. गुप्ता यांना झालेल्या जीवघेण्या आक्रमणामुळे  उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. (धर्मांधांच्या संदर्भात पोलिसांनी अशी भूमिका घेतली असती का ? हिंदू अतिसहिष्णु असल्यामुळेच त्यांना अशा प्रकारे वागणूक मिळत आहे. अशा पोलिसांना हिंदू कसे विसरतील ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या कालावधीत धर्मांध युवक असिफ शेख याने श्री. गुप्ता यांनी माझ्यावर वार केल्याची खोटी तक्रार पोलिसांत दाखल केली.

३. श्री. गुप्ता यांच्या गुप्ता जनरल स्टोअर्स या दुकानातून मुसलमानांनी साहित्य खरेदी करू नये, असा फतवाही या भागात धर्मांधांकडून लावण्यात आला आहे. धर्मांधाच्या त्रासाला कंटाळून हे ठिकाण सोडून गेलेले सर्वश्री शिवमुरत गुप्ता यांच्या रिक्शाच्या काचा फोडणे, कपड्यांवर ब्लेड मारणे, श्री. गणेश गुप्ता यांना मारहाण करणे, अशा प्रकारे गंभीर त्रास देण्यात आला होता.

४. या ठिकाणी धर्मांधांकडून हिंदूंची वीज-पाणी चोरणे, असे प्रकार घडत आहेत.

हिंदूंनो, तुम्ही भारतात रहाता कि पाकमध्ये ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बैगनवाडी येथील दत्तमंदिर सांभाळणार्‍या हिंदूंचा धर्मांधांकडून अतोनात छळ आणि त्रास !

या भागात धर्मांध बहुसंख्य असल्यामुळे या ठिकाणी अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर दिवसेंदिवस आक्रमणांचे प्रमाण वाढत आहे. बैगनवाडी पद्मानगर रस्ता क्रमांक १४ जवळील दत्तमंदिरात धर्मांधांकडून हिंदूंना पूजा करू दिली जात नाही. या मंदिरात दिवा लावणार्‍या आणि मंदिरात पूजा करणार्‍या हिंदूंना मारहाण करणे, धमकी देणे असे प्रकार धर्मांधांकडून केले जातात. (अल्पसंख्यांक असूनही काँग्रेसच्या लांगूलचालनामुळे उद्दाम बनलेले धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) काही कट्टर हिंदुत्ववाद्यांमुळेच हे मंदिर टिकून आहे. या मंदिरात वीज देणार्‍यांना धमकी दिली जाते. रिलायन्स आस्थापनाकडे वेगळ्या वीजमीटरसाठी पैसे भरूनही मंदिरात विजेचा मीटर लावला जात नाही. मंदिराच्या आवारात धर्मांधांकडून वर्षातून अनेक वेळा कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात येतो. या वेळी संपूर्ण दत्तमंदिर झाकण्यात येते. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर स्टंप लावून धर्मांध क्रिकेट खेळतात. त्यामुळे हिंदूंना मंदिरात जायला अडचण होते. क्रिकेट खेळतांना चेंडू मंदिरात जातो.

पोलिसांची अक्षम्य निष्क्रीयता !

धर्मांधांकडून वारंवार होणार्‍या आघातांबाबत हिंदू तक्रार करायला गेल्यास पोलीस हिंदूंना तुम्ही संख्येने अल्प आहात. तुम्ही शांत रहा. तुम्ही काय करणार ? त्यांना कार्यक्रम करू द्या, अशा प्रकारचा सल्ला देतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *