Menu Close

ISISमध्ये चाललेल्या तिघांना नागपुरात अटक

भारतातील तरुण इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित होत असल्याची गहन चर्चा सुरू असतानाच, आयसिसचे ‘जिहादी’ होण्यासाठी निघालेल्या तीन मित्रांना नागपुरातून अटक करण्यात आली आहे. हे तिघेही हैदराबादचे रहिवासी असून नागपूरमार्गे श्रीनगरला निघाले होते. त्यांना एटीएसनं तेलंगण पोलिसांच्या विशेष पथकाकडे सोपवलं आहे.

मुंबईत मालाडजवळच्या मालवणी भागातील काही तरुण आयसिसमध्ये सामील होण्यासाठी घर सोडून गेल्याची बातमी दोनच दिवसांपूर्वी आली होती. त्याआधी पुण्याच्या एका तरुणीलाही आयसिसनं झपाटलं होतं. जम्मू-काश्मीरमध्येही अनेक तरुण आयसिसच्या प्रेमात आकंठ बुडालेत. हे संकट दिवसेंदिवस गहिरं होत चालल्याचं आज स्पष्ट झालं. अब्दुल वसीम, उमर फारुखी आणि हसन फारुखी हे तीन तरुण आयसिसमध्ये जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना महाराष्ट्र एटीएसनं नागपूरच्या बाबासाहेब आंबडेकर एअरपोर्टवरून सापळा रचून अटक केली. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं एटीएसचे महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी सांगितलं.

स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *