टी. राजासिंह आणि इतर हिंदुत्ववादी यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेला मिळाले यश !
अशा हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन करणार्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांना साथ देणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी !
भाग्यनगर – उस्मानिया विद्यापिठात १० डिसेंबर या दिवशी काही विद्यार्थी संघटनांनी मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या साहाय्याने आयोजित केलेल्या गोमांस मेजवानीला उस्मानिया विद्यापिठाने अनुमती नाकारली असून असा कुठलाही कार्यक्रम विद्यापिठाच्या आवारात करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. गेले काही दिवस गोरक्षक आणि हिंदुत्ववादी यांनी या मेजवानीला तीव्र विरोध दर्शवला होता. प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनीही विद्यापिठात घुसून ही मेजवानी रोखण्यात येईल, असे ठणकावून सांगितले होते.
भाग्यनगरमधील उस्मानिया विश्वविद्यालयातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी आणि काही शिक्षक प्रभृतींनी गोहत्या बंदीच्या विरोधात १० डिसेंबर या दिवशी गोमांस मेजवानी आयोजित केली होती. या कार्यक्रमाला विरोध होत असतांनाच काही विद्यार्थी संघटनांनी त्याच दिवशी विद्यापिठात पोर्क मेजवानी आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे वाढता तणाव लक्षात घेऊन विद्यापिठाने वरील निर्णय घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात