- हिंदूंनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणे, ही हिंदूंना शिक्षाच होय !
- मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी केले भूमीपूजन
- राज्यकर्त्यांची ढोंगी धर्मनिरपेक्षता ?
गुंटूर (आंध्रप्रदेश) : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर शहराजवळील थाक्केल्लापडू या गावात राज्य शासनाकडून उभारण्यात येणार्या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे. यानंतर नायडू यांनी शासनस्तरावरील ख्रिसमस कार्यक्रमात सहभाग घेतला आणि सामाजिक कार्य केल्याविषयी ९ ख्रिस्त्यांचा सत्कार केला. (शासनाने कधी शासकीय स्तरावर हिंदूंचे सण साजरे केले आहेत का ?- संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी मुख्यमंत्री नायडू म्हणाले,
१. तेलुगु देसम् हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून तो सर्व धर्मियांच्या हितांचे रक्षण करील. धर्मांतरित ख्रिस्त्यांना अनुसूचित जातीचे लाभ देऊ.
३. जेरुसलेम यात्रेला जाणार्या ख्रिस्ती यात्रेकरूंना अनुदान देण्यासाठी शासनाने कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे. (पुष्कर यात्रेकरूंच्या प्रवास तिकिटांवर कर आकारणारे शासन ख्रिस्त्यांच्या यात्रेला अनुदान देतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)