शिवसेनेला अयोध्येत राममंदिर हवे आहे. २०१७मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होणार असून, त्यात काही पक्षांना राममंदिराचा मुद्दा हवा आहे. परंतु आता राममंदिराचा राजकीय मुद्दा करू नका, अयोध्येत राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी संघर्ष झाला. देशभरातून करसेवक राममंदिर बांधण्यासाठी अयोध्येला गेले होते. परंतु आजही अयोध्येत राममंदिर उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे आता केवळ आंदोलनाची घोषणा काही पक्ष करीत आहेत. अशा घोषणा आता नकोत. तर राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रात मांडली आहे.
पाकसारख्या दहशतवादी देशाशी संबंध नकोत
पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाशी कुठलाही संबंध ठेवू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानकपणे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाकमध्ये पोहोचले, परंतु इकडे काश्मीरमध्ये पाक दहशतवाद्यांकडून हल्ले होत आहेत, याचा विचार भाजपने करावा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी नवाज शरीफ यांचा वाढदिवस होता. तर दाऊदचा वाढदिवस हादुसऱ्या दिवशी आहे. दाऊदचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाकचे अनेक खासदार, मंत्री, आयएसआयचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नवाज यांच्या भेटीनंतर मोदी जर पाकिस्तान दाऊदला भारताच्या हवाली करणार असेल तर या भेटीचे स्वागत करायला हरकत नाही असेही ते म्हणाले.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स