Menu Close

अवैधरित्या ४ गायींची कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

Gohatya_M

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : येथून अवैधरित्या ४ गायींची कोंबून आणि निर्दयपणे वाहतूक करणार्‍या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. हिंदु धर्माभिमान्यांच्या तत्परतेमुळे या गायींची मुक्तता करण्यात आली. (अशा सतर्क आणि तत्पर धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. हिंदु धर्माभिमानी श्री. अर्जुन साळुंके आणि श्री. संजय सोनवणे यांनी एका वाहनचालकाची चौकशी केल्यावर त्याच्या वाहनात ४ गायींना कोंबून भरले असल्याचे लक्षात आले. याविषयी विचारताच त्याने हिंदूंना जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच अरेरावी करत म्हटले, “मी याअगोदरही पुष्कळ गायी मारल्या आहेत. आता या गायींनाही घेऊन जात आहे.” (गोवंशहत्या बंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीस शासन कधी प्रारंभ करणार आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. प्रारंभी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार प्रविष्ट करण्यास हिंदू गेले. तेव्हा पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ केली. (अशा पोलिसांना खडसवण्यासाठी हिंदूसंघटनच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्माभिमान्यांच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी गुन्हा नोंदवला. तक्रार देणार्‍यांमध्ये वरील हिंदु धर्माभिमान्यांसह महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यकंट अरण्य महाराज, विकास वाघमारे, विनायक माळी, अमित कदम आणि सारोळा येथील धर्माभिमानी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *