Menu Close

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह ४० शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट !

मनकर्णिका कुंडावरील शौचालय तोडल्याचे प्रकरण

धर्मरक्षणार्थ कृती करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट करणारे पोलीस मात्र आझाद मैदानावर दंगल घडवणार्‍या धर्मांधांसमोर शेपूट घालतात ! अशी पोलीस यंत्रणा हवी कशाला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात, दैनिक सनातन प्रभात

rajesh_kshirsagar

कोल्हापूर : येथील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय तोडून दीड लाख रुपयांची हानी केल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, नगरसेवक राहुल चव्हाण, गटनेते नियोज खान यांसह ४० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ६ जूनला रात्री उशिरा गुन्हा प्रविष्ट केला आहे. महापालिकेचे खाजगी ठेकेदार राजूरौशन श्रीकेदार सिंग (वय २६ वर्षे, रहाणार बलरा-इस्माईल, बिहार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे प्रविष्ट करण्यात आले. ७ जून या दिवशी आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांसह १० शिवसैनिकांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने सर्वांची जामिनावर सुटका केली. (मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय हटवण्यासाठी वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलन करूनही अनधिकृत शौचालय प्रशासनाने पाडले नाही. सतत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिका आयुक्त पी. रविशंकर करत असल्याच्या हिंदूंच्या तक्रारी आहेत. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भावनांचा उद्रेक होऊन शौचालय तोडण्यात आले. याला उत्तरदायी असलेले जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यावर प्रथम गुन्हा प्रविष्ट करायला हवा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याच्या मागणीकडे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासन यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने श्री. क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना घेऊन शौचालय तोडून टाकले. ६ जूनला दुपारी कोणीच तक्रार प्रविष्ट न केल्यामुळे पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते; मात्र रात्री पोलिसांनी श्री. राजेश क्षीरसागर यांसह नगरसेवक राहुल चव्हाण, निजाज खान, राजू काझी, उदय भोसले, जयवंत हारुगले, रणजित जाधव, ओमकार परमाने, सुनील जाधव, सुनील भोसले यांसह ४० जणांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १४३, १४७, ४२७ प्रमाणे सार्वजनिक मालमत्तेची हानी, अनधिकृत जमाव, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आदी कलमांखाली गुन्हा प्रविष्ट केला आहे.

आमदारनिधीतून फिरत्या शौचालयाची सोय करणार ! – आमदार क्षीरसागर

आमदार श्री. राजेश क्षीरसागर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, भाविकांची गैरसोय व्हावी, या उद्देशाने मनकर्णिका कुंडावरील स्वच्छतागृह तोडले नाही. भाविकांची सोय करण्यासाठी आमदार निधीतून फिरत्या शौचालयाची (मोबाईल टॉयलेटची) सोय करणार आहे. महापालिकाही फिरत्या शौचालयाची सोय करणार आहे. याचसमवेत शहरात यात्री निवास, उपाहारगृह व्यावसायिक आदींकडून भाविकांची होणारी लूट थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *