- देशातील हिंदूंचे रक्षण करू न शकणार्या केंद्र सरकारकडून बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थ !
- जगभरात कार्य करणार्या हिंदुत्ववादी संघटना याविरोधात काहीच का बोलत नाहीत ?
- हिंदूंनो, अशा बातम्या वाचून झोपू नका, तर स्वरक्षणार्थ संघटित व्हा ! लवकरच भारतात अशी स्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशच्या झेनिदा जिल्ह्यातील नोलदांगा येथे आनंदा गोपाल गांगुली या ७० वर्षांच्या पुजार्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये गैर मुसलमान आणि सुधारणावाद्यांच्या होणार्या हत्या पहाता इसिसच्या आतंकवाद्यांकडून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
१. येथील शेतामध्ये आनंदा गोपाल गांगुली यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती या परिसराचे पोलीस प्रमुख गोपीनाथ कांजीलाल यांनी दिली. आनंदा यांचे डोके शरिरापासून वेगळे केले असल्याविषयीही त्यांनी सांगितले.
२. गांगुली हे पुजारी होते आणि या भागातील हिंदूंच्या घरांमध्ये ते पूजाविधी करायचे. नेहमीप्रमाणे पूजेसाठी घरातून निघाल्यानंतर वाटेत अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.
३. ही हत्या करणार्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही. मृतदेह ज्या ठिकाणी आढळला आहे, ते पहाता या घटनेचा साक्षीदार मिळण्याचीही शक्यता अल्प आहे.
४. गेल्या १० आठवड्यांत अशा १० हत्या करण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक हत्येनंतर विशिष्ट खूण सोडून जाण्याची या आतंकवाद्यांची पद्धत असून अशाच प्रकारची खूण पुजार्याच्या मृतदेहावरही आढळली आहे. त्यामुळे ही हत्या याच आतंकवादी गटांनी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात