मुसलमानांच्या धार्मिक संघटना जिहादी आतंकवादी आरोपींच्या सुटकेसाठी सर्व प्रकारे साहाय्य करतात, तसे किती हिंदुत्ववादी आणि धार्मिक संघटना हिंदुत्वासाठी अटकेत असणार्या हिंदूंना साहाय्य करतात ?
नवी देहली : जमीयत उलेमा-ए-हिंद या मुसलमानांच्या धार्मिक संघटनेने आतंकवादाच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आलेल्या मुसलमान आरोपींचा जकातीच्या पैशातून खटला लढण्याचा निर्णय घेतला आहे. जकात म्हणजे मुसलमानांनी प्रत्येक वर्षी त्यांच्या उत्पन्नातील २.५ टक्के रक्कम द्यायची प्रथा. जकात मुसलमानांचे ५ वे कर्तव्य आहे. रमजानच्या काळात तो जमा केला जातो आणि वाटला जातो. जमीयत उलेमा-ए-हिंद यापूर्वीपासून आरोपी आतंकवाद्यांचा खटला लढवत आली आहे. आता तिने या लढाईसाठी जकातमध्ये पैसा देण्याचे आवाहन केले आहे.
जमीयत उलेमा-ए-हिंदच्या विधी विभागाचे प्रमुख गुलजार आझमी म्हणाले की, कुराण आणि हदीसमध्ये जकातच्या उपयोगाचे ८ प्रकार सांगितले आहेत. त्यातच एक प्रकार आहे की, कारागृहात असणार्यांना साहाय्य करणे. गेल्या वर्षी संस्थेने ४१० मुसलमान आरोपींचे खटले लढण्यासाठी २ कोटी रुपये खर्च केले होते. हे सर्व आरोपी ५२ आतंकवादी प्रकरणात अटकेत होते. यातील १०८ जणांच्या विरोधातील आरोप काढण्यात आले.
एका सर्वेक्षणानुसार जर भारतातील १७ कोटी ८० लाख मुसलमानांपैकी केवळ १० टक्के मुसलमानांनी जकात दिली, तरी ७ सहस्र ५०० कोटी रुपये होतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात