Menu Close

पुरुष राष्ट्राचे संरक्षण करत असतील, तर महिलांनी मुलींचे संरक्षण करायला हवे ! – सौ. अनुपमा रेड्डी, सामाजिक कार्यकर्त्या

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचे उद्घाटन !

bengluru_ranragini
डावीकडून दीपप्रज्वलन करतांना सौ. अनुपमा रेड्डी, कु. भव्या गौडा आणि श्री. गुरूप्रसाद

बेंगळुरू : आज पालक त्यांच्या मुलांना योग्य पोशाखाविषयी सांगत नाहीत. आज धर्माविषयी अभिमान नसल्याने आपल्या मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे आपल्या धर्मातील सर्व मुलींचे संरक्षण होण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. पुरुष राष्ट्राचे संरक्षण करत असतील, तर महिलांनी मुलींचे संरक्षण करायला हवे, असे प्रतिपादन बेंगळुरू येथील अनुबंध न्यासाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनुपमा शेट्टी यांनी केले. स्त्रियांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेचे आदीचुंचनगरी, समुदायभवन, विजयानगर येथे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद, रणरागिणी शाखेच्या समन्वयक कु. भव्या गौडा आणि मैसूर, हासन आणि तुमकूर येथील रणरागिणी शाखेच्या समन्वयक सौ. सुमा मंजेश यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

स्त्रिया धर्माचरण करत नसल्याने त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ ! – कु. भव्या गौडा

आपला इतिहास पहाता लढाई करणे, वेदांचा अभ्यास करणे इत्यादी सर्व क्षेत्रात हिंदु स्त्रियांनी असाधारण ध्येये साध्य केली आहेत; कारण त्या वेळी त्या धर्माचरण करत होत्या. सध्या स्त्रिया सर्व क्षेत्रांत असूनही त्यांच्यावरील अत्याचार वाढत आहेत; कारण त्या धर्माचरण करत नाहीत. आता रक्षकच भक्षक बनल्याने स्वसंरक्षणासाठी कुणावरही अवलंबून न रहाता आपण स्वावलंबी व्हायला हवे, त्याबरोबरच संघटनही महत्त्वाचे आहे.

हिंदु स्त्री धर्म विसरत असल्याने तिच्याकडून धर्माचा अनादर ! – श्री. गुरुप्रसाद

मातेच्या गर्भामध्ये असल्यापासून मुलांवर संस्कार होत असतात. जिजाबाईंच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाविषयी तीव्र विचार असल्याने त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवू शकल्या. आज हिंदु स्त्री धर्म विसरत असल्याने तिच्याकडून धर्माचा आदर केला जात नाही. त्यामुळे त्यांच्याकडून धर्माविरुद्ध कृती होत आहेत. आज लव्ह जिहादच्या विरोधात लढा देण्यासाठी, धर्मप्रसार करण्यासाठी, भक्त असलेल्या हिंदु स्त्रियांचे संघटन करणे, प्रसिद्धीमाध्यमांमधील अश्‍लीलता दूर करणे, तसेच हिंदूंमध्ये संघटन करणे, ही रणरागिणी शाखेची ५ प्रमुख उद्दिष्टे आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *