संभाजीनगर : हिंदु युवती धर्माचरण करत नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या मुलांसमवेत पसार होतात, ही हिंदूंसाठी खेदाची गोष्ट आहे. हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणे टाळायचे असेल, तर त्यांनी धर्माचरण करून आपले आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले.
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने श्री कचनेर क्षेत्र येथील बडजातेनगर येथे ‘स्वराज्य ग्रुप’ने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. (धर्मजागृती सभेचे आयोजन करणार्या ‘स्वराज्य ग्रुप’चे अभिनंदन ! अशा संघटना या हिंदु धर्माची शक्ती आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी उपस्थित होते. या सभेला २२५ हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती होती.
शासनाने राज्यभरात पर्जन्ययाग करण्यासाठी निधी दिल्यास त्याचा सर्वांनाच लाभ – नागेश जोशी
सध्या कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लक्षावधी रुपयांचा व्यय केला जातो; पण प्रयोग यशस्वीही होत नाही. याउलट बार्शी तालुक्यामध्ये (सोलापूर) येथे नुकतेच एका संतांनी पर्जन्ययाग करून पाऊस पाडल्याचे उदाहरण सिद्ध झाले आहे. त्यामुळे शासनाने हिंदूंच्या धार्मिक विधींना प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी शासनाने राज्यभरात पर्जन्ययाग करण्यासाठी निधी वापरला, तर त्याचा योग्य विनियोग होईल आणि सर्वांनाच लाभ होईल. समितीच्या कार्याचा परिचय श्री. राहुल मराठे यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. शीतल पाटणी यांनी केले.
क्षणचित्र : सभेपूर्वी पावसाचे वातावरण होते; मात्र सभा संपल्यावरच वरूणदेवतेचे आगमन झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात