Menu Close

उत्तरप्रदेशच्या दधेडू कलां येथे रविदास मंदिरात ध्वनीक्षेपकावरून आरती ऐकवल्याने धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण !

मुसलमानप्रेमी समाजवादी पक्षाच्या राज्यात धर्मांधांचा आतंकवाद आणि असुरक्षित हिंदू !

  • मंदिरातील ध्वनीक्षेपक तोडले
  • मंदिरावर दगडफेक
  • दलित हिंदूंच्या घरावर आक्रमण

देशातील बहुसंख्य हिंदू आवश्यकता नसतांनाही अनेक वर्षांपासून प्रतिदिन ५ वेळा अजान ऐकत आहेत; मात्र त्यांनी कधी असे आक्रमण केले नाही, ही त्यांची सहिष्णुता नाही का ?
धर्मांध, हिंदूंवर ते हिंदू असल्याने आक्रमण करतात, मग ते दलित असो कि सवर्ण; हे धर्मांधांशी मैत्री करणारे नेते लक्षात घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

mandir-vidhvansचरथावल/मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : दधेडू कलां गावात रमझानच्या पहिल्या दिवशी धर्मांधांकडून येथील रविदास मंदिरावर आक्रमण करण्यात आले. मंदिरातील ध्वनीक्षेपक तोडण्यात आले. तसेच मंदिरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीसफाटा येथे पोचल्याने मोठी दुर्घटना टळली. सायंकाळी अजानच्या वेळी मंदिरातील आरतीही चालू झाल्याने आणि ती ध्वनीक्षेपकावरून ऐकवण्यात आल्याने हे आक्रमण करण्यात आले.

१. आरती ऐकवण्यात येत असतांना इमरान, वाजिद आणि अन्य धर्मांधांनी मंदिराजवळ येऊन ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले. तेव्हा झालेल्या वादातून धर्मांधांनी दगडफेक करत ध्नवीक्षेपक तोडून टाकले. पोलिसांनी इमरान आणि वाजिद यांना अटक केली आहे.

२. येथील दलितांच्या घरावरही सशस्त्र धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. यात काही दलित हिंदू घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

३. पोलिसांनी दोन्हीकडच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन या वादावर तोडगा काढला. यात अजानच्या १० मिनिटानंतर आरती करण्यात येईल, असे ठरवण्यात आले. (हिंदूंकडून असे आक्रमण झाले असते, तर पोलिसांनी असा तोडगा काढला नसता, तर हिंदूंना कारागृहात डांबले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *