२० व्या शतकात भारतातील ज्या राज्यांत हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने रोडावली. अशा उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड, आसाम, बंगाल, राजस्थानमधील मेवात आणि केरळ राज्य आघाडीवर आहे. यातील केरळचा आढावा पुढे देत आहोत.
१. वर्ष १९०१ पासून केरळ राज्यातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांची लोकसंख्या भारताच्या इतर भागांच्या तुलनेत अनेक पटीने वाढली आहे.
२. १९०१ मध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या १३.८ टक्के होती ती वर्ष १९६१ मध्ये वाढून २१.२ टक्के झाली होती. नंतर मात्र ती न्यून होऊन सध्या १८.४ टक्के आहे.
३. १९०१ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या १७.३ टक्के होती ती ख्रिस्ताब्द २०११ मध्ये वाढून २६.६ टक्के झाली आहे. यापैकी बहुतेक वाढ १९६१ नंतर झालेली आहे.
४. याच तुलनेत १९०१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या ६८.९ टक्के होती ती २०११ मध्ये घसरून ५५ टक्के झाली आहे. म्हणजेच १४ टक्क्यांनी न्यून झाली आहे. उत्तर केरळात हिंदू अल्पसंख्य झाले आहेत तर दक्षिण केरळात जेमतेम ५८.५ टक्के उरले आहेत.
५. वर्ष १९६१ ते १९७१ या १० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या अतिशय जलद गतीने वाढली. वर्ष १९७१ नंतर सर्वच धर्मीयांची लोकसंख्या घटली; मात्र मुसलमानांची लोकसंख्या न्यून होण्याचा दर इतर धर्मियांपेक्षा म्हणावा तेवढा न्यून नव्हता. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणातील दरी वाढतच गेली.
६. २००१ ते २०११ या १० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या १२.८ टक्क्यांनी वाढली, तर हिंदू २.२ टक्क्यांनी आणि ख्रिस्ती १.४ टक्क्यांनी वाढले.
७. मुसलमानांची लोकसंख्या इतर धर्मियांच्या तुलनेत वाढत असली तरी साक्षरता, शहरीकरण आणि श्रीमंतीच्या तुलनेत मुसलमान इतर धर्मियांपेक्षा न्यून पडत नाहीत. त्यामुळे मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला निरक्षरता आणि गरिबी कारणीभूत आहे, हा समज सपशेल खोटा ठरतो.
८. लोकसंख्येतील असमतोल उत्तर केरळमध्ये लक्षणीय दिसून येतो. तेथे मुसलमान ४३.५ टक्के आहेत. तर हिंदूंची संख्या १८.४ टक्क्यांनी न्यून झाली आहे.
९. मलप्पुरम् जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ७०.२ आहे. या जिल्ह्यातील सर्व तालुके आणि शेजारचे काही तालुके यांत मुसलमान बहुसंख्य म्हणजे ४० टक्क्यांच्या वर आहेत.
१०. केरळ राज्याच्या उत्तरी आणि दक्षिण सागरी तटावर असणार्या बहुतेक सर्वच जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यातल्या त्यात कासारगोड जिल्ह्यातील त्याच नावाच्या तालुक्यात मुसलमान प्रचंड प्रमाणात आहेत. हा तालुका कर्नाटकातील सागर तालुक्याच्या सीमेवर आहे. तेथेही मुसलमान बहुसंख्येने आहेत. गोव्यापर्यंत असलेल्या सागरी तटावर मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत.
११. ख्रिस्ती दक्षिण केरळ राज्यातील कोट्टायम, इडुक्की, पठानमथीट्टा आणि एर्नाकुलम् जिल्ह्यात बहुसंख्येने आहेत. एकूण १३ तालुक्यांत ख्रिस्ती लोकसंख्या ४० टक्क्यांच्या वर आहे.
१२. ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मियांनी केरळ राज्यातील त्यांच्या लोकसंख्येत २० व्या शतकात आणि २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात प्रचंड वाढ नोंदवली आहे. त्याचा परिणाम हिंदूंची लोकसंख्या न्यून होण्यात झाला आहे. २००१-११ च्या जनगणनेनुसार ही दरी वाढतच आहे आणि ती पुढील अनेक वर्षे वाढतच राहणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात