ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून लोकांना वाचवण्यासाठी गाय वाचली पाहिजे !
देशातील सहस्रो पशूवधगृहांच्या संकटातून तिला वाचवण्यासाठी केंद्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवू शकते, असे करनाल (पंजाब) येथील राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानने आतापर्यंत केलेल्या अनेक संशोधनांतून आणि मागील ५ वर्षांपासून एन्आयसीआरए (नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रेसीलिएंट अॅग्रीकल्चर)च्या प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनाचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे.
१. या संशोधनातून विदेशी आणि संकरित जातीच्या दूध देणार्या प्राण्यांपेक्षा देशी गायींमध्ये अधिक तापमान सहन करण्याची क्षमता आहे आणि जल-वायू परिवर्तनाचा त्यांच्यावर अल्प प्रभाव पडतो, या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे.
२. देशी गायींना त्यांच्या त्वचेमुळे उष्णता सहन करण्यास साहाय्य होते.
३. एनडीआरआयच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कमाल आणि किमान तापमानाचा परिणाम गायींच्या दूध देण्याच्या क्षमतेवर होतो.
४. उन्हाळ्यात ४० अंशाहून अधिक आणि हिवाळ्यामध्ये २० अंशाहून अल्प तापमान झाल्यास दुधाच्या उत्पादनामध्ये ३० टक्क्यांनी घट होते, असे अभ्यासांती लक्षात आले आहे.
५. अधिक तापमानामुळे संकरित जातीच्या गायींकडून १५ ते २० टक्के अल्प दूध मिळू शकते; मात्र देशी गायींवर याचा परिणाम होत नाही.
६. तापमानात झालेली वाढ अधिक कालावधीपर्यंत चालू राहिल्यास दूध देण्याच्या क्षमतेसह गायी-म्हशींच्या प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
७. राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानचे डॉ. ए.के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, देशातील एकूण दूध उत्पादनापैकी ५१ टक्के दूध म्हशींकडून, २० टक्के देशी जातीच्या गायींपासून, तर २५ टक्के विदेशी जातीच्या गायींपासून मिळते. तापमान वाढत गेल्यास स्थिती आणखी बिकट होऊ शकते. अशा वेळी देशी गायी पाळणे, हाच त्यावर उत्तम उपाय आहे. गायींमध्ये साहीवाल आणि म्हशींमध्ये मुर्रा हे वंश देशभरामध्ये कुठेही पाळता येतात.
८. बरेली येथील पशूचिकित्सा अनुसंधान संस्थान (आयव्हीआरआय)चे प्रमुख शास्त्रज्ञ ज्ञानेंद्र गौड यांनी सांगितले की, तापमान वाढले, तर त्याचा परिणाम संकरित गायींवर होऊन त्या सर्वाधिक प्रमाणात आजारी पडतात. त्यामुळे त्या चारा खाणे अल्प करतात आणि अशक्त होतात. त्याचा परिणाम दूध देण्यावर होतो. याउलट देशी वंशाच्या गायी लगेच आजारी पडत नाहीत.
९. देशभरात गायींच्या ३९ आणि म्हशींच्या १३ प्रजाती आहेत. देशी जातीच्या गिर गायीने काही वर्षांपूर्वी ब्राझील येथे ६२ लिटर दूध दिले होते.
१०. ग्लोबल वार्मिंगचा दूध उत्पादनावर पुष्कळ हानीकारक परिणाम होऊ शकतो, असे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे (एन्डीडीबीचे) म्हणणे आहे.
११. शास्त्रज्ञांनी जलवायू परिवर्तनामुळे वर्ष २०२० पर्यंत दूध उत्पादनामध्ये ३० लाख टनहून अधिक वार्षिक घट होऊ शकते, अशी सतर्कतेची चेतावणी दिली आहे.
१२. वर्ष २०१५-१६ मध्ये दुधाचे एकूण उत्पादन १६ कोटी टन झाले आहे.
१३. आयव्हीआरआयमध्ये दूध देणार्या २५० गायी-म्हशी आहेत. यांच्यामुळे सुमारे २ सहस्र ७०० लिटर दूध मिळते; मात्र तापमान वाढल्यामुळे त्या दिवसांत केवळ २ सहस्र २०० लिटर दूध मिळू शकले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात