गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच यांनी पत्रकार परिषदेत उघड केलेली माहिती
भुवनेश्वर : देहली येथील गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन देऊन ओडिशा राज्यातून बंगाल आणि बांगलादेश येथे गोहत्येसाठी होणार्या गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे.
१. ओडिशा राज्यातून प्रत्येक दिवशी ४ सहस्र गोवंशाची हत्येसाठी तस्करी होते. बालासोर या सीमा नाक्यावरून राज्याबाहेर तस्करी होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
२. या तस्करांचे आतंकवादी, मादक पदार्थांचे व्यापारी यांच्याशी जवळचे संबंध असून ही गोष्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला माहीत असूनही यावर काहीच कठोर कारवाई होत नाही, ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.
३. देशातील सर्वांत मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी ओडिशा राज्यातूनच होत आहे, अशी माहिती गोज्ञान प्रतिष्ठानच्या प्रवक्त्या श्रीमती जगप्रीत लुथरा यांनी दिली.
४. श्रीमती जगप्रीत लुथरा या गेले काही आठवडे ओडिशा राज्यातील पोलीस अधीक्षकांशी संपर्क करत आहेत. त्यांना पोलीस खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असला, तरी तस्करीचे हाताबाहेर गेलेले प्रमाण पहाता पोलीस अधिकारीही हतबल झाले आहेत.
५. या तस्करांचे पोलीस आणि स्थानिक राजकारणी यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेता केंद्रशासनाने पुढाकार घेतला, तरच या प्रकाराला आळा बसू शकतो, अशी आशा भारत रक्षा मंचाचे सहसमन्वयक श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी व्यक्त केली.
गोसेवा मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी कृष्णानंद यांचा मृतदेह भाक्रा नांगल धरणामध्ये सापडला !
गोतस्करांकडून हत्या करण्यात आल्याचा संशय
ऊना/नंगल (पंजाब) : गेल्या ५ दिवसांपासून संशयास्दरित्या बेपत्ता असणारे राष्ट्रीय गोसेवा मिशनचे अध्यक्ष स्वामी कृष्णानंद यांचा मृतदेह भाक्रा नांगल धरणाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. स्वामी कृष्णानंद यांच्या भक्तांकडून भाजप-अकाली दल शासनाकडे स्वामींना सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात