मनकर्णिका कुंडावरील शौचालय तोडल्याचे प्रकरण
असे धर्माभिमानी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोल्हापूर : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय पाडल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्यासह १५ शिवसैनिकांना जुना राजवाडा पोलिसांनी ८ जून या दिवशी अटक करून न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
६ जून या दिवशी मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याच्या मागणीकडे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दुर्लक्ष केल्याने श्री. क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना घेऊन शौचालय तोडून टाकले. या दिवशी दुपारी कोणीच तक्रार प्रविष्ट न केल्यामुळे पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते; मात्र त्या दिवशी रात्री पोलिसांनी श्री. राजेश क्षीरसागर यांसह ४० शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट केले होते.
काही कारणास्तव श्री. राजेश क्षीरसागर हे मुंबई येथे गेल्यामुळे पोलिसांनी ७ जून या दिवशी १० शिवसैनिकांना अटक करून त्यांची २० सहस्र रुपयांच्या जामिनावर सुटका केली होती. ८ जून या दिवशी मुंबईहून श्री. क्षीरसागर परत आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात