Menu Close

अमरावतीत धर्मांधांकडून शिवसैनिकाची सशस्त्र आक्रमणाद्वारे हत्या !

धर्मांधांचा उच्छाद ! हिंदूंनो, तुम्ही भारतात रहाता कि पाकमध्ये ?
अशा बातम्या वाचून झोपू नका, तर स्वतःचे रक्षण होण्यासाठी संघटित व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

dharmandh2अमरावती : शहरातील अकोली रस्ता येथे १८ ते २० धर्मांधांनी एका शिवसैनिकावर चाकू, गुप्ती आणि तलवारीने आक्रमण करून त्यांची नुकतीच हत्या केली. सुरेंद्र वासुदेव वानखडे असे मृत शिवसैनिकाचे नाव असून ते शिवसेनेचे युवा कार्यकर्ते होते. या आक्रमणात त्यांचे बंधू रवींद्र हे गंभीर घायाळ झाले. या प्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अकोलीच्या घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १७ आरोपींना अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनुसार ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले जाते. (धर्मांध सशस्त्र होऊन हिंदूंची हत्या करतात, हे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचे लक्षण आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सुरेंद्र आणि रवींद्र हे दोघे बंधू घरासमोर चर्चा करत बसले होते. या वेळी आरोपी पठाण याच्या कुटुंबातील काही सदस्यांसमवेत त्यांचा शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पठाण कुटुंबातील १५ ते २० जणांनी तलवार, चाकू, गुप्ती, कुर्‍हाडीने सुरेंद्र आणि रवींद्र यांच्यावर आक्रमण केले. या वेळी सुरेंद्र हे घरात गेले आणि त्यांनी दार बंद करून घेतले. यावर आरोपींनी दार तोडून त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात सुरेंद्र गतप्राण झाले, तर रवींद्र घायाळ झाले.

ही माहिती मिळाल्यावर १० मिनिटांत शिवसेनेचे प्रशांत जाधव आणि नगरसेविका सौ. मंजुषा जाधव यांनी वानखडे यांच्या घरी धाव घेतली. दुसर्‍या दिवशी कडक पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *