राहुरी (जिल्हा नगर) : जन्म-मरणाच्या फेर्यातून मुक्तता पाहिजे असल्यास संत आणि महात्मे यांच्या सहवासात जा. आज धर्म आणि राष्ट्र निष्ठा जतन करून ठेवणे आवश्यक आहे. आपल्या स्वार्थासाठी कुणापुढेही झुकण्याच्या वृत्तीमुळेच आपल्यावर अनेक परकीयांची आक्रमणे झाली. आपल्यातील लोभी (लालची) वृत्तीमुळे इतिहासातील अनेक लढायांमध्ये आपल्याला हार पत्करावी लागली. हुतात्म्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युवकांनी जगावे. सद्यस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आपल्याला विसर पडत चालल्याची खंत श्री शिवप्रतिष्ठानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी व्यक्त केली.
क्षत्रिय महाराणा प्रताप सामाजिक युवक संघटना संक्रापूर, दवणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप जयंतीनिमित्त केशव गोविंद मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेते अनिल राठोड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी विजय शिवतारे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी समाजाकरता कार्य करतांना शेकडो किल्ले बांधले; परंतु एकाही किल्ल्याला स्वत:चे नाव दिले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात